मराठी बातम्या /बातम्या /Viral /

OMG! श्वानाला असं काही करताना तुम्ही कधीच पाहिलं नसेल; VIDEO पाहून नेटिझन्स थक्क

OMG! श्वानाला असं काही करताना तुम्ही कधीच पाहिलं नसेल; VIDEO पाहून नेटिझन्स थक्क

श्वानही असं काही करू शकतो का? असाच प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडेल.

श्वानही असं काही करू शकतो का? असाच प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडेल.

श्वानही असं काही करू शकतो का? असाच प्रश्न तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर पडेल.

मुंबई, 03 एप्रिल : माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांनाही (Pets) भावना, संवेदना आणि आवडी-निवडी असतात. बहुतांश लोक आवड म्हणून कुत्रा (Dog video), मांजर (Cat) पाळतात. काही लोकांचं तर या प्राण्यांशी अगदी जिव्हाळ्याचं नातं असतं. सोशल मीडियावर (Social Media) कुत्रा, मांजराचे व्हिडिओ, फोटोज शेअर केले जातात. यातील बहुतांश व्हिडिओ, फोटो हे मनोरंजनपर असतात. काही लोक कुत्रा, मांजराच्या अनोख्या करामतीचेही फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. पाळीव कुत्र्यांशी संबंधित व्हिडिओ (Video) नेटिझन्स (Netizens) मोठ्या आवडीनं पाहतात. असे व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral) देखील होत असतात. अशा पोस्टला नेटिझन्सकडून मोठा प्रतिसाद मिळतो. सध्या एका पाळीव कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओची नेटिझन्समध्ये मोठी चर्चा आहे (Dog high jumping video). या व्हिडिओवर कमेंट्सचा (Comments) अक्षरशः पाऊस पडला आहे.

पाळीव कुत्र्याचा हा जबरदस्त व्हिडिओ pawficionados नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून (Instagram Account) शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवरुन यापूर्वी देखील कुत्र्यांचे खास व्हिडिओ आणि फोटोज शेअर करण्यात आले आहेत. नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडिओवर नेटिझन्सनं खास कमेंट्स केल्या आहेत. हा व्हिडिओ काही मिनिटं का होईना युजरचं मनोरंजन नक्कीच करतो.

हे वाचा - मोबाईल नंबर मागताच मुलीने काढली आपल्या पायातील चप्पल; रोडरोमिओला धू धू धुतलं; पाहा VIDEO

या व्हायरल व्हिडिओत एका कुत्र्याची मालकीण (Owner) त्याच्या आवडीची वस्तू कपाटातून बाहेर काढत आहे. त्यामुळे या कुत्र्याला खूप आनंद झाला असून, तो एकाच जागी उभा राहत जमिनीपासून कित्येक फूट उंच उडी (Jump) मारताना दिसत आहे. सर्वसामान्यपणे कोणताही कुत्रा इतकी उंच उडी मारत नाही. त्यामुळे कुत्र्याची ही उंच उडी पाहून नेटिझन्सने आश्चर्य व्यक्त केलं आहे. या व्हिडिओत कुत्रा आणि त्याची मालकीण यांच्यातील प्रेम, जिव्हाळा पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नेटिझन्सला विशेष आनंद देतो.

हा व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं व्हिडिओवर कमेंट करताना लिहिलं आहे, की 'हे कुत्रा आणि मालकीण यांच्यातलं प्रेम आहे'. दुसऱ्या एका युजरनं 'हा कुत्रा इतकी उंच उडी मारतोय, त्यानं ऑलिम्पिकमध्ये जायला हवं', अशी कमेंट केली आहे. 'एखादा कुत्रा इतकी उंच उडी कशी मारु शकतो?', अशी प्रश्नार्थी कमेंट एका युजरनं या व्हिडिओवर केली आहे. `हा फनी व्हिडिओ मला खूपच आवडला,` असं एका युजरनं म्हटलं आहे.

हे वाचा - VIDEO - टीव्हीत वाघाला पाहताच जीव वाचवण्याची धडपड; तरुणाने उचललं खतरनाक पाऊल

एकूणच जोरदार व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतली कुत्र्याची उंच उडी नेटिझन्सच्या पसंतीस उतरल्याचं दिसून येतं.

First published:

Tags: Dog, Pet animal, Viral, Viral videos