मुंबई, 23 फेब्रुवारी : आपल्या कुत्र्याला घरातील एखाद्या सदस्याप्रमाणेच वागणूक देणारे अनेकजण असतात. बच्चेकंपनीला देखील कुत्र्यासोबत खेळायला आवडतं. बॉलीवूड अभिनेत्री सिमी गरेवालने (Simi Garewal) देखील सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामधील कुत्र्याला पाहून तुम्ही थक्क व्हाल.
सिमी सोशल मीडियावर नेहमी अक्टिव्ह असते. विविध फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. सिमीने शेअर केलेला असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. सिमी गरेवालने आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीयो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये काही मुलं क्रिकेट खेळाताना दिसत आहेत. पण या क्रिकेटमध्ये जो विकेटकीपर आहे तो चक्क एक कुत्रा आहे. या व्हिडीओमध्ये दूर गेलेला चेंडू धावत जाऊन परत आणून देताना का कुत्रा दिसत आहे.
(हेही वाचा-2800 फुट उंचावरून या मुलीने केलं असं काही, VIDEO पाहून हृदयाचे ठोके नक्की वाढतील)
सिमी गरेवालने (Simi Garewal) शेअर केलेला व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. फलंदाजी करणाऱ्या मुलीने जसा जोरदार शॉट मारला, तेवढ्याच वेगाने हा कुत्रा चेंडू आणण्यासाठी पळत आहे. या व्हिडीओवर खूप लोकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. यावर काही मजेशीर कमेंट्स देखील आल्या आहेत. 'हा कुत्रा नक्की धोनीचा कुत्रा असेल', 'BCCIने याची दखल घ्यावी' अशा काही मजेशीर कमेंट्स या व्हिडीओवर ट्विटर युजर्सनी केल्या आहेत.
An award for the Best Fielder of the Year!! pic.twitter.com/7PWBLBgnnV
— Simi Garewal (@Simi_Garewal) February 20, 2020
कुत्र्याचा हा अंदाज पाहून सिमीला देखील आश्च्रर्य वाटलं आहे. "याला बेस्ट फील्डरचा अवॉर्ड" असं कॅप्शन देत या अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर केला आहे.