Home /News /viral /

कॅमेऱ्यात कैद झालं श्वानाचं खतरनाक कृत्य; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, 'याला अटक करा'

कॅमेऱ्यात कैद झालं श्वानाचं खतरनाक कृत्य; VIDEO पाहून नेटिझन्स म्हणाले, 'याला अटक करा'

श्वानाने जे केलं ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. हा व्हिडीओ व्हायरल झाला, तो पाहून नेटिझन्स शॉक झाले आहेत.

  मुंबई, 28 एप्रिल : श्वानांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (Dog video). यापैकी काही व्हिडीओ इमोशनल तर बहुतेक फनी असतात. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यात कुत्र्याने असं काही केलं आहे की पाहून सर्वजण शॉक झाले आहेत. त्याने इतकं खतरनाक कृत्य केलं आहे की पाहून त्याला अटक करण्याचीच मागणी होऊ लागली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचं हे कांड कैद झालं (Dog hit and run video). एका कुत्र्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. याचं कारणही धक्कादायक आहे. त्याने जे केलं ते पाहून हा सलमान खानचाच कुत्रा असावा अशीच प्रतिक्रिया बहुतेक नेटिझन्सनी दिली आहे. असं त्याने केलं तर काय ते पाहुयात. व्हिडीओत पाहू शकता रस्त्याशेजारी पार्किंगमध्ये काही गाड्या पार्क केलेल्या दिसत आहेत. एक कार तिथं येते आणि तिथं पार्क होते. त्यातून एक व्यक्ती बाहेर पडते आणि रस्त्याच्या कडेपर्यंत येते. रोड क्रॉस करण्यासाठी ती व्यक्ती उभी असते. इतक्यात एक डॉग तिथं धावत येतो. ती व्यक्ती रस्ता ओलांडणार तोच कुत्रा इतक्या वेगाने धावतो की त्या व्यक्तीला धक्का मारून पुढे जातो. हे वाचा - Shocking! मगरींच्या कळपात घुसला एकटा माणूस; अंगावर काटा आणणारा VIDEO ती व्यक्ती धाडकन जमिनीवर आपटते. रस्त्यावर ती बसतेच. ती इतक्या जोरात पडते की तिच्या कमरेलाही मार लागल्याचं दिसतं आहे. कारण तिने पडताच कमरेवर हात धरला आहे आणि चेहऱ्यावरून तिला वेदना होत असल्याचंही दिसत आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Meemlogy (@meemlogy)

  या व्यक्तीची अशी अवस्था केली ती एका श्वानाने. या श्वानाला सलमान खानचाच श्वान असावा असं म्हटलं जातं आहे. याच कारण म्हणजे हिट अँड रन प्रकरण. सलमान खानचं हे प्रकरण तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाही. श्वानाचा हा व्हिडीओ पाहून बहुतेक नेटिझन्सना त्याच प्रकरणाची आठवण झाली आहे. हे वाचा - छोट्याशा माकडामुळे शक्तिशाली बिबट्यालाही फुटला घाम; नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा VIDEO एका व्यक्तीला धक्का देऊन, तिला पाडून कुत्र्याने तिथून पळ काढला आहे. त्याला अटक करा, अशी मागणीही चक्क एका युझरने केली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Dog, Pet animal, Viral, Viral videos

  पुढील बातम्या