फ्लोरिडा, 3 डिसेंबर : एका गोंडस, गुबगुबीत आणि चांगले कपडे घातलेल्या कुत्र्याची कल्पना करा. आता, तोच कुत्रा कार चालवण्याचा पराक्रम करत असेल तर? न्यूयॉर्क पोस्टने अलीकडेच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये फुटपाथवर काही पादचारी दिसत आहेत. त्यांच्यासोबत एक लहानसा कुत्रा मिनी कार चालवतानाही दिसतोय. गोल्डन केस असलेला पोमेरेनियन एक चमकदार, काळी मिनी कार 'ड्राईव्ह' करतोय. हे आश्चर्यकारक दृश्य प्रत्येकजण त्याच्याकडे वळून-वळून पाहत होता.
सेलिब्रिटी म्हणून फुटपाथवर फिरत असताना हा फॅन्सी पोमेरेनियन (Pomeranian) कुत्रा अमेरिकेतील एका रस्त्यावर दिसला.
कार जशी वळते तसं लक्षात येतं की, ती रिमोट-कंट्रोल्ड कार आहे. तेथे उभे असलेले टेरन्स मार्टिन म्हणाले की, या छोट्या कुत्र्यामुळे मोठा गोंधळ उडाला. जरी ही एखाद्या अनोख्या घटनेसारखी वाटली तरीही प्रत्यक्षात अशा प्रकारची पहिलीच घटना नाही. लोक बर्याच काळापासून अनेक जण आपल्या पाळीव प्राण्यांचे रिमोट-कंट्रोल्ड कार 'ड्रायव्हिंग'चे व्हिडीओ शेअर करत असतात.
I was pissed because I didn’t make the light but then I got to witness this pic.twitter.com/Jocni1FWtF
— Kels (@Kelciium) April 7, 2019
काही वर्षांपूर्वी, एका युट्युब युजरने सॅन डिएगोच्या रस्त्यावर एक पोमेरियनने सोनेरी रंगाची 'लक्झरी कार' चालवण्याचा व्हिडीओ शेअर केला होता.
इंटरनेटवर, माणसासारख्या क्रिया करताना कुत्री आणि मांजरं पहायला लोकांना आवडतं. या व्हिडिओला 5.7 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.