OMG! श्वानाला खायला मिळालं नाही तर त्यानं गिळले चक्क 140 पाउंड

OMG! श्वानाला खायला मिळालं नाही तर त्यानं गिळले चक्क 140 पाउंड

ओजीनी लेटरबॉक्समधून लिफाफा काढला आणि तो चावून त्याची वाट लावली. यूकेतील नॉर्थ वेल्समध्ये ही घटना घडली असून या घटनेनंतर ओजीचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

  • Share this:

नॉर्थ वेल्स, 12 जानेवारी : अनेकदा प्राण्यांना खाली पडलेल्या वस्तू खायची किंवा मिळेल त्या वस्तूसोबत खेळायची सवय असते. अगदी मांजराचं पिल्लू असो किंवा श्वान. हाताला लागेल त्या वस्तूला तोंडात घेऊन चावायची आणि त्याची वाट लावणे अशा स्थितीमुळे अनेकदा खूप मोठं नुकसान देखील होत असतं. एका श्वानानं असाच प्रताप केला आहे ज्याचा खूप मोठा फटका तरुणाला बसला. या श्वानाचं नाव ओजी आहे. ओजीनं 160 पाउंडची चावून वाट लावली अक्षरश: चोखा केला. या जगावेगळ्या कारनाम्याला पाहून तर तरुणानं डोक्यावरच हात मारायचा बाकी ठेवला होता.

160 पाउंड चघळल्याने मालकाचं हजारो रुपयांचं नुकसान झालं आहे. शेवटी त्यानी डोक्यावर हात मारून घेतला. नऊ वर्षांच्या ओजीनी मालकाच्या लेटर बॉक्समध्ये असलेला चलनी नोटांनी भरलेला लिफाफा फाडला आणि त्यातील नोटांसोबत खेळायला सुरुवात केली. मालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार या नोटा एकूण 160 पाउंड म्हणजेच रुपयात मोजायचे तर जवळपास 14 हजार 500 रुपये होते.

ओजीनी लेटरबॉक्समधून लिफाफा काढला आणि तो चावून त्याची वाट लावली. यूकेतील नॉर्थ वेल्समध्ये ही घटना घडली असून या घटनेनंतर ओजीचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. ओजीच्या मालकानी स्वत: फेसबूकवर आपल्या या श्वानाचा फोटो टाकून पोस्ट शेअर केली आहे त्यात त्यानी म्हटलंय, ‘ हा दिवस मला फार महागात पडला.’

It's been an expensive Monday for Ozzie's owners... ‍♀️

#labradoodle #ozzie #naughty #llandudno #wales #vets #veterinary #money #dog #dogsofinstagram

Posted by Murphy & Co Veterinary Practice on Monday, 29 April 2019

हे वाचा-सिंहाशी मस्ती करणाऱ्या व्यक्तीवर, सिंहीणीने अचानक केला हल्ला आणि..;व्हिडिओ VIRAL

पण या सगळ्या प्रकरणात ओजीचा दोष नाही कारण त्याला खायला हवं होतं तो ते शोधत होता त्याला हे पाकिट दिसलं त्याला वाटलं की यात खाद्यपदार्थ आहेत म्हमून त्यानी ते खाऊन वाट लावली. मालकाला हे लक्षात आल्यावर त्यानी ओजीला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी ओजीला उलटी करायला लावल्यावर त्यातून हे पाउंड बाहेर आले. आणखी महत्त्वाचं म्हणजे ओजीनी 14 हजार रुपये गिळलेच पण त्याच्या उपचारांसाठी 11 हजार रुपये खर्च झाला म्हणजे मालकासाठी तो दिवस अधिकच खर्चिक ठरला.

सध्या पाळीव प्राण्यांच्या अनेक कथा इंटरनेटवर पडत असतात. त्या मनोरंजक असतील तर व्हायरलही होतात. घरातील श्वान, मांजरी गमतीजमती करत राहतात आणि त्यांचे मालक त्या नेटवर अपलोड करत राहतात. काही कुत्र्यांचे तर फेसबुकवर प्रोफाइलही आहेत. त्यांना अनेक फॉलोअर्स असतात. अशी ही सोशल मीडियावरही पाळीव प्राण्यांची एक आगळीवेगळी, मनोरंजनक दुनियाच निर्माण झाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: January 12, 2021, 1:37 PM IST

ताज्या बातम्या