VIDEO: मालकिणीच्या काळजीनं कुत्रा व्याकूळ; रुग्णावाहिकेचा पाठलाग करत पोहोचला रुग्णालयात

आपल्या मालकिणीला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना हा कुत्रादेखील रुग्णावाहिकेसोबत धावत जातो. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Emotional Video Viral) होत आहे.

आपल्या मालकिणीला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना हा कुत्रादेखील रुग्णावाहिकेसोबत धावत जातो. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Emotional Video Viral) होत आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली 12 जून: आपण पाळीव प्राण्यांना जितका जीव लावतो, तितकंच तेदेखील आपल्याला लावतात. विशेषतः कुत्रा (Dog) हा प्राणी तर अगदी तुमचा खास मित्रच बनून जातो. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो तुमच्यासोबत असतो. कुत्रा आणि माणसातील या खास नात्याचा आणखी एक व्हिडिओ आता समोर आला आहे. आपल्या मालकीणीला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना हा कुत्रादेखील रुग्णावाहिकेसोबत धावत जातो. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल (Emotional Video Viral) होत आहे. दिव्यांग मुलाच्या मदतीसाठी धावून आला खाकीतील देवदूत; भावुक करणारा VIDEO VIRAL या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या महिलेवर बरेच दिवस घरीच उपचार सुरू होते. यावेळी हा श्वानही तिच्याजवळच बसून राहात असे. मात्र, कालांतरानं महिलेला रुग्णालयात डॉक्टरांच्या निरीक्षणात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोग्य कर्मचारी या महिलेला रुग्णवाहिकेत घेऊन जात असतानाही तो सतत आसपासच राहिला. मात्र, या श्वानाला रुग्णवाहिकेत बसू दिलं गेलं नाही. रुग्णवाहिकेचा दरवाजा बंद करण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांना असं वाटलं, की आता हा श्वान घरीच आपल्या मालकाची वाट पाहात थांबेल. 'Metro सुरू आहे का? गर्लफ्रेंडला भेटायला जायचंय', तरुणाला मिळालं मजेशीर उत्तर श्वानानं मात्र आपल्या मालकीणीसोबतच जाण्याचा निर्णय घेतला आणि तो रुग्णवाहिकेसोबत धावू लागला. तो अगदी रुग्णालयापर्यंत जाऊन पोहोचला. यानंतर तो रुग्णालयाच्या दरवाजात तोपर्यंत वाट पाहात राहिला जोपर्यंत त्याला त्याच्या मालकीणीला पुन्हा भेटता आलं नाही. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून नेटकऱ्यांना भावुक करत आहे. या श्वानाला रुग्णालयात पाणी आणि खाण्याची व्यवस्था करा, असं अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. एका युजरनं म्हटलं, की याच कारणामुळे आपल्याला श्वान जास्त आवडतात...ते खास मित्रांपेक्षाही अधिक प्रामाणिक असतात.
    Published by:Kiran Pharate
    First published: