मराठी बातम्या /बातम्या /Viral /कुत्र्याला विनाकारण मारत होता; श्वानाने अशी अद्दल घडवली की आयुष्यभर लक्षात ठेवेल, VIDEO

कुत्र्याला विनाकारण मारत होता; श्वानाने अशी अद्दल घडवली की आयुष्यभर लक्षात ठेवेल, VIDEO

कुत्र्याने तरुणाला घडवली अद्दल

कुत्र्याने तरुणाला घडवली अद्दल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने कुत्र्याला पकडून ठेवलेलं दिसतं. तर दुसरी व्यक्ती त्याला झाडाच्या देठाने मारायला लागते.

नवी दिल्ली 27 मे : तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये काही लोक प्राण्यांना विनाकारण त्रास देताना किंवा मारताना दिसतात. मात्र प्राणी काहीही बोलू शकत नाहीत. परंतु, काही प्राणी सुद्धा इतके रागीट असतात की त्यांना विनाकारण छेडलं तर ते लगेचच त्या व्यक्तीला चांगलाच धडा शिकवतात. सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यामध्ये माणसं प्राण्यांना त्रास देताना दिसतात. मात्र, आता एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे.

Shocking! ती एक चूक जीवावर बेतली; 40 मगरींनी व्यक्तीचे तुकडे करून हातही गिळला

यात एक व्यक्ती श्वानाची खोड काढताना दिसतो. मात्र कुत्राही शांत न बसता तिथेच बदला घेतो आणि या तरुणाला अद्दल घडवतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने कुत्र्याला पकडून ठेवलेलं दिसतं. तर दुसरी व्यक्ती त्याला झाडाच्या देठाने मारायला लागते. जेव्हा त्या माणसाने कुत्र्याला काठीने मारले, तेव्हा कुत्र्याचा राग सातव्या आसमानावर पोहोचला. त्यानंतर कुत्र्याने अगदी रागात त्या व्यक्तीवर हल्ला केला

हा कुत्रा या व्यक्तीला खाली पाडून चावू लागला. यानंतर दुसऱ्या व्यक्तीने आपल्या मित्राला कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. कारण कुत्र्याला एवढा राग आला होता की, जो कोणी त्याच्यासमोर येईल त्याच्यावर तो हल्ला करेल.

कुत्र्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी तो तरुण कसा धडपडत आहे, हे व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं. त्याचा मित्रही त्याला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करतो, पण तरीही त्याला कुत्र्याच्या तावडीतून वाचवू शकत नाही. हा व्हिडिओ @cctvidiots नावाच्या अकाऊंटवरुन ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिडिओला जवळपास 60 लाख व्ह्यूज आले आहेत. अनेकजण कमेंटमध्ये फक्त कुत्र्याचं कौतुक करत आहे. तर या तरुणासोबत असंच व्हायला हवं होतं, असंही अनेकांनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हे देखील समजलं असेल की प्राण्यांशी विनाकारण पंगा घेतल्यास काय शिक्षा मिळू शकते. जेव्हा ते भडकतात तेव्हा समोरच्यावर भयानक हल्ला करतात.

First published:
top videos

    Tags: Dog, Shocking video viral