मराठी बातम्या /बातम्या /Viral /अरेच्चा! या व्यक्तीचा डान्स कुत्र्यालाही आवडला नाही; कॅमेऱ्यासमोरच थेट हल्ला केला..Video

अरेच्चा! या व्यक्तीचा डान्स कुत्र्यालाही आवडला नाही; कॅमेऱ्यासमोरच थेट हल्ला केला..Video

डान्स करणाऱ्या व्यक्तीला चावला कुत्रा

डान्स करणाऱ्या व्यक्तीला चावला कुत्रा

कुत्रा चावल्यानंतर ती व्यक्ती स्वत:ला वाचवण्याऐवजी किंवा कुत्र्याला हाकलण्याऐवजी नाचताना दिसते. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे

नवी दिल्ली 26 मे : सोशल मीडियावर दररोज हजारो डान्सचे व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यामध्ये काही व्हिडिओ लोकांच्या खास डान्स स्टेप्समुळे यूजर्सची मनं जिंकतात तर काही क्रिएटिव्ह स्टाइलने लोकांचं लक्ष वेधतात. नुकताच असा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डान्स करताना दिसत आहे. त्याचवेळी एक कुत्रा माणसाच्या पायाला चावताना दिसत आहे.

अंगाचं पाणी पाणी करणाऱ्या विचित्र जीवाचा VIDEO VIRAL; तुम्ही सांगू शकता हा कोण?

सहसा, जेव्हा जेव्हा कुत्रे रस्त्यावर किंवा परिसरात कोणाच्या मागे पळू लागतात आणि भुंकतात तेव्हा लोक आपला जीव वाचवून पळताना दिसतात. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये वेगळंच चित्र दिसत आहे. यात कुत्रा चावल्यानंतर ती व्यक्ती स्वत:ला वाचवण्याऐवजी किंवा कुत्र्याला हाकलण्याऐवजी नाचताना दिसते. जे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर हजारो युजर्सचं लक्ष वेधून घेत आहे.

हा व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे. रिनाल्डो सोरेस नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रिनाल्डो सोरेस त्याच्या घराबाहेरील गल्लीत नाचताना दिसत आहे. यादरम्यान एक कुत्रा सतत दाताने त्याचा पाय चावताना दिसतो. जे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला सोशल मीडियावर 4 लाख 45 हजारांहून अधिक युजर्सनी लाईक केलं आहे, तर 13 लाखांहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ पाहिला आहे. रिनाल्डो सोरेसचे असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतील. ज्यामध्ये हा कुत्रा त्याच्यासोबत सतत पाय चावताना दिसत आहे. त्यामुळेच त्याचे बरेचसे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

First published:
top videos

    Tags: Dog, Shocking video viral