Home /News /viral /

पाळीव श्वानाला घेऊन फिरत होती तरुणी; अचानक भटक्या कुत्र्याने केला हल्ला अन्.., Shocking Video

पाळीव श्वानाला घेऊन फिरत होती तरुणी; अचानक भटक्या कुत्र्याने केला हल्ला अन्.., Shocking Video

    नवी दिल्ली 20 डिसेंबर : आजकाल लोक श्वान पाळण्यास अधिक पसंती देत आहे. मात्र, हे श्वान काहीवेळा तितकेच घातकही ठरू शकतात. सध्या देशात सुरू असलेलं कुत्रा आणि माकडांचं टोळीयुद्ध (Monkey-Dog Gang war) जगभरात चर्चेत आहे. अशातच आता इंटरनेटवर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक लहान श्वानावर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याचं पाहायला मिळतं (Dog Attacks on Puppy). VIDEO - बापरे! तोंडात पाय धरला आणि...; चक्क कासवाने केला कुत्र्यावर खतरनाक हल्ला व्हिडिओ अमेरिकेच्या लास वेगासमधील आहे. यात एक तरुणी आपल्या पाळीव श्वानाला घेऊन बाहेर फिरण्यासाठी निघालेली दिसते. ती या श्वानासोबत खेळत असतानाच तिथे एक भटका कुत्रा येतो. कुत्रा तिथे पोहोचताच संपूर्ण दृश्यच बदलून जातं. पाहता पाहता हा कुत्रा या तरुणीवर आणि तिच्या पाळीव श्वानावर हल्ला करण्याच्या प्रयत्नात दिसतो. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, ही तरुणी आपल्या आई-वडिलांसोबत याठिकाणी सुट्ट्या घालवण्यासाठी आली होती. यावेळी घरातील आपल्या पाळीव कुत्र्यासोबत खेळण्यासाठी ती बाहेर आली. बाहेर येऊन तिने पाळीव श्वानाला आवाज दिल. हा श्वान लगेचच पळत आला. मात्र, त्याच्यासोबत एक भटका कुत्राही तिथे पोहोचला. सुरुवातीला ही तरुणी या कुत्र्यासोबतही फार चांगल्या पद्धतीने वागली. मात्र काहीच वेळात हा कुत्रा हल्ला करू लागला. यानंतर या तरुणीने आपल्या पाळीव कुत्र्याला उचलून घेतलं. मग काय भटक्या कुत्र्याने दोघांवरही हल्ला करण्यास सुरुवात केली. Ring.Com कडून या घटनेचा व्हिडिओ शेअऱ केला गेला आहे. म्हशीवर हल्ला करण्यासाठी आला वाघ अन्..; पाहा पुढे काय घडलं, शिकारीचा Live Video हा व्हिडिओ पाहून काही वेळासाठी तुम्हीही घाबराल. ही मुलगी मदतीसाठी ओरडू लागते. इतक्यात शेजारीच पार्सल डिलिव्हरीसाठी आलेला ट्रक ड्रायवर धावत तिथे पोहोचतो. तो स्वतः कुत्र्याच्या समोर उभा राहून या मुलीला आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन घरात जाण्यास सांगतो. ही मुलगी घरात जाताच कुत्रा शांत होतो.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Dog, Shocking video viral

    पुढील बातम्या