Home /News /viral /

VIDEO - इवल्याशा उंदरावर तुटून पडला श्वानांचा कळप; शेवटपर्यंत एकट्याने लढा दिला अखेर...

VIDEO - इवल्याशा उंदरावर तुटून पडला श्वानांचा कळप; शेवटपर्यंत एकट्याने लढा दिला अखेर...

छोट्याशा उंदरावर श्वानांनी हल्ला केला. व्हिडीओ पाहून नेटिझन्सही हैराण झाले आहेत.

    मुंबई, 27 मे : उंदीर म्हटलं की त्याच्या विरुद्ध समोर दिसते ती मांजर (Rat video). पडद्यावरील टॉम अँड जेरीप्रमाणे रिअल लाइफमध्येही उंदीर-मांजर पाहायला मिळतात. उंदीर-मांजरांचे असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात (Animal video viral). छोटासा उंदीर आपल्यापेक्षा आकाराने आणि ताकदीने मोठ्या असलेल्याही मांजराला कसं थकवून सोडतो हे तुम्हाला माहितीच आहे. पण हाच उंदीर श्वानांवरही भारी पडू शकतो. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे (Dog and rat video). श्वानांच्या कळपाने एका उंदरावर हल्ला केला आहे. लहान आणि एकटा म्हणून श्वानांनी या उंदराला चारही बाजूंनी घेरलं (Dog attack on rat video). एकेएक करत त्याच्यावर अटॅक केला. त्याला आपली शिकार बनवण्याचा प्रयत्न केला. पण उंदरानेही हार मानली नाही. त्याने एकट्याने इतक्या श्वानांचा बिनधास्तपणे सामना केला. त्यानंतर जे घडलं ते पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. हे वाचा - मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण व्हिडीओत पाहू शकता एका गार्डनमध्ये काही लोक आपल्या पाळीव श्वानांना फिरवायला घेऊन आले आहेत. तिथं एक उंदीर येतो. त्याला पाहताच सर्व श्वान त्याच्यावर तुटून पडतात. त्याच्यावर हल्ला करतात, त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. पण उंदीर कसाबसा त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतो. एक श्वान तर उंदराला आपल्या तोंडात धरण्यातही यशस्वी ठरतो. पण उंदीर टुणकन उडी मारून त्याच्या तोंडातून बाहेर पडतो. त्यानंतर श्वानांचे मालक तिथं येतात. ते श्वानांना उंदरावर हल्ला करण्यापासून रोखतात. त्यानंतर उंदीर तिथून कुठे जातो माहिती नाही. व्हिडीओच्या शेवटपर्यंत तरी श्वान उंदराची शिकार करण्यात यशस्वी ठरले असं कुठेच दिसत नाही. इवलासा असला तरी उंदीर शेवटपर्यंत या श्वानांशी लढा देताना दिसतो. हे वाचा - Video Game खेळत टॉयलेट सीटवर बसला, खालून सापाने साधला डाव; गुप्तांगात दात घुसले आणि... @dinfowars ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. बहुतेकांनी उंदराच्या हिमतीला सर्वांनी दाद दिली आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Dog, Other animal, Pet animal, Viral, Viral videos

    पुढील बातम्या