मराठी बातम्या /बातम्या /Viral /कुत्रा आणि वाघ भिडल्याचं पाहून पळाला सिंह; सोशल मीडियावर Video Viral

कुत्रा आणि वाघ भिडल्याचं पाहून पळाला सिंह; सोशल मीडियावर Video Viral

पण तुम्ही कधी कुत्र्याला वाघाशी भांडताना पाहिलं आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात सिंह, वाघ आणि कुत्रा यांच्यात जबरदस्त झुंज सुरू असल्याचं दिसतं.

पण तुम्ही कधी कुत्र्याला वाघाशी भांडताना पाहिलं आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात सिंह, वाघ आणि कुत्रा यांच्यात जबरदस्त झुंज सुरू असल्याचं दिसतं.

पण तुम्ही कधी कुत्र्याला वाघाशी भांडताना पाहिलं आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात सिंह, वाघ आणि कुत्रा यांच्यात जबरदस्त झुंज सुरू असल्याचं दिसतं.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 28 जानेवारी : एखादा कुत्रा दुसऱ्या कुत्र्याशी किंवा मांजराशी भांडताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात; पण तुम्ही कधी कुत्र्याला वाघाशी भांडताना पाहिलं आहे का? असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात सिंह, वाघ आणि कुत्रा यांच्यात जबरदस्त झुंज सुरू असल्याचं दिसतं.

  हा व्हिडिओ अ‍ॅनिमल्स पॉवर नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत एक गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा वाघाच्या कानाचा चावा घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या कुत्र्याने वाघाचा कान घट्ट पकडला असून, त्याला एखाद्या मोठ्या मांजराच्या कानाचा चावा घेत असल्यासारखं वाटत आहे. व्हिडिओत शेजारी एक सिंहही बसलेला दिसत आहे.

  Hyderabad Biryani : हैदराबादमधले बिर्याणीचे 'हे' प्रकार तुम्हाला माहिती आहेत का?

  हा सिंह या लढाईत न पडण्याचा प्रयत्न करत आहे. वाघ मात्र कुत्र्यावर हल्ला करण्याऐवजी सिंहावर हल्ला करताना दिसत आहे. हे पाहून सिंह बाहेरच्या बाजूला उडी मारतो, तर कुत्रा वाघाशी लढताना दिसत आहे. नंतर सिंह मागून येतो आणि वाघावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. कुत्रा लढत असतानाही वाघ उडी मारतो. काही जण कुंपणाभोवती उभं राहून हे अद्भुत दृश्य पाहत असल्याने हा व्हिडिओ प्राणिसंग्रहालयातला असल्याचं लक्षात येतं.

  या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'कुत्रा विरुद्ध वाघ' असं लिहिलं आहे. हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर त्याला 25 हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले असून, त्या लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. प्राण्यांमधली ही असमान्य लढाई पाहून नेटकरी अवाक झाले आहेत.

  या व्हिडिओवर कमेंट करताना एका युझरने `यात काही तरी गडबड आहे, हा वाघ नाही तर वाघीण आहे,` अशी कमेंट केली आहे. `या प्राण्यांसोबत कुत्रे का पकडतात, त्यांच्याशी लढणारं अजून कोणी नाही,` असं दुसऱ्या एका युझरने लिहिलं आहे. `हे सामान्य होतं आणि हे प्राणी खरोखर खेळत होते,` असं काही युझर्सनी म्हटलं आहे. आणखी एका युझरने लिहिलं आहे, की `मला वाटतं ते खेळत आहेत. वाघांमध्ये भरपूर अ‍ॅड्रेनालिन असतं.

  सावधान! सतत दारू प्यायल्यानं ‘डीएनए’मध्ये होऊ शकतो वाईट परिणाम

  एका युझरने निदर्शनास आणून दिलं, की `कुत्र्याने वाघ आणि सिंहाचं संगोपन केलं आहे. पिल्लू असल्यापासून त्या कुत्र्याने त्यांना वाढवलं आहे आणि ही खरोखरच एक सुंदर कथा आहे.` एकूणच हा कुत्रा आणि वाघाचा हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे. वाघासारख्या हिंस्र प्राण्याशी कुत्रा कसा लढू शकतो, असा प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो.

  (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

  First published:

  Tags: Lifestyle, Social media viral, Video viral