मराठी बातम्या /बातम्या /Viral /

VIDEO VIRAL: 3 वर्षांपूर्वी मालकापासून दुरावला होता कुत्रा; अशी झाली गळाभेट

VIDEO VIRAL: 3 वर्षांपूर्वी मालकापासून दुरावला होता कुत्रा; अशी झाली गळाभेट

डेब्रा आणि लोला एकमेकांपासून वेगळे होऊन तीन वर्षं झाली होती आणि दोघांनी पुन्हा एकमेकांना भेटण्याची आशा सोडली होती. पण...  प्राणीप्रेमी नसाल तरी तुमच्या डोळ्यात हा video पाहून येईल पाणी

डेब्रा आणि लोला एकमेकांपासून वेगळे होऊन तीन वर्षं झाली होती आणि दोघांनी पुन्हा एकमेकांना भेटण्याची आशा सोडली होती. पण... प्राणीप्रेमी नसाल तरी तुमच्या डोळ्यात हा video पाहून येईल पाणी

डेब्रा आणि लोला एकमेकांपासून वेगळे होऊन तीन वर्षं झाली होती आणि दोघांनी पुन्हा एकमेकांना भेटण्याची आशा सोडली होती. पण... प्राणीप्रेमी नसाल तरी तुमच्या डोळ्यात हा video पाहून येईल पाणी

न्यूयॉर्क, 7 डिसेंबर : डेब्रा आणि लोला एकमेकांपासून वेगळे होऊन तीन वर्षं झाली होती आणि दोघांनी पुन्हा एकमेकांना भेटण्याची आशा सोडली होती. पण एक दिवस आला जेव्हा अचानक लोला समोर उभा राहिला आणि डेब्राला त्याचे डोळे आणि नशीब यावर विश्वासच बसत नव्हता. ही गोष्ट आहे डेब्रा आणि त्याचा पाळीव कुत्रा लोला याची. अमेरिकेतील मिशिगन येथील आपल्या मालकापासून तीन वर्षांपासून दूर राहिल्यानंतर लोला हा लॅब्रेडोर (Lebrador) कुत्रा घरी पुन्हा आला. डुपेज काउंटी (DuPage County) या पशु कल्याण सेवा संस्थेने या कुत्र्याला व त्याच्या मालकाला पुन्हा भेटवले. आपल्या प्रिय कुत्र्याला भेटल्यानंतर डेब्रा मेजेउर शनिवारी म्हणाले की 'मला वाटतं की माझे स्वप्न पूर्ण झाले आहे'. 2017 मध्ये जेव्हा मेजेउर दाम्पत्य एल्क ग्रोव व्हिलेज मधील आपल्या मित्राला भेटायला गेले तेव्हा त्यावेळेस लोला घरातून निघाला व तो परत आलाच नाही. त्यावेळी या जोडप्याने त्यांच्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अनेक व्यावसायिकच्या सेवांचा वापर केला. नोटिसा लावल्या परंतु त्यांना यश मिळाले नाही. गेल्या आठवड्यात इलिनॉय येथील ग्लेनडेल हाईट्स (Glyendel Hights) मध्ये एका जोडप्याने डुपेज काउंटी संस्थेला फोन केला व त्यांना सांगितले की गेल्या काही वर्षांपासून संरक्षित वनक्षेत्रात ते लोलाला पाहत आहेत. ते लोलाला जेवण सुद्धा देतात आणि त्याची देखभालसुद्धा करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर लोलाच्या गळपट्ट्यातील मायक्रोचीपच्या मदतीने त्याच्या मालकाचा शोध घेण्यात आला. यावर डेब्रा म्हणाले की, मला थोडी सुद्धा आशा नव्हती. मी असा विचारही केला होता की कदाचित तो आता परत येणार नाही. परंतु आता लोलाला पाहून डेब्राला खूपच आनंद झाला आहे. कदाचित लोलाला सांगता आलं असतं तर त्यानी सांगितलं असतं की तो तीन वर्षं कसा आणि कुठे राहिला. तीन वर्षानंतर या भेटीनंतर लोलाला पुन्हा पाहून डेब्रा व त्यांचा परिवार खूपच खूष झाला आहे. प्राणी हे माणसापेक्षा जास्त इमानदार आणि मायाळू असतात. त्यांना एकदा कोणी जीव लावला तर मरेपर्यंत ते कधीच त्या माणसाला विसरत नाहीत व इमानदारीने त्याच्यासोबत आयुष्य घालवतात. तसेच माणसांनादेखील प्राण्यांचा लळा लागला तर त्या प्राण्यापासून दूर होणे हे माणसाला अधिकच कठीण जाते. यातच लोलापासून तीन वर्ष दूर राहणं हे डेब्राला खूपच कठीण गेलं. यात त्यांनी लोलाला शोधण्याचा खूपच प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पण अखेर तीन वर्षांनंतर जेव्हा लोला त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही.
First published:

Tags: Dog, Owner of dog, Viral video.

पुढील बातम्या