Home /News /viral /

धक्कादायक! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकला घातक बॉम्ब; अवस्था पाहून डॉक्टही हादरले

धक्कादायक! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये अडकला घातक बॉम्ब; अवस्था पाहून डॉक्टही हादरले

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातक बॉम्ब अडकला होता (Explosive Stuck In Man's Rectum). जेव्हा हा व्यक्ती रुग्णालयात पोहोचला तेव्हा डॉक्टरही हैराण झाले

    नवी दिल्ली 04 डिसेंबर : दुर्घटना कधी, कोणासोबत आणि कशी घडेल हे कोणालाही सांगता येत नाही. या घटनांवर कोणाचंही नियंत्रण नसतं. अनेकदा तर अशा घटना घडतात ज्या लोकांना हैराण करतात. नुकतंच एका अतिशय विचित्र घटनेची शिकार झालेल्या व्यक्तीच्या कथेनं सर्वांनाच हैराण केलं आहे. इंग्लंडमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातक बॉम्ब अडकला होता (Explosive Stuck In Man's Rectum). जेव्हा हा व्यक्ती रुग्णालयात पोहोचला तेव्हा डॉक्टरही हैराण झाले. प्रायव्हेट पार्टमधून काढण्यात आलेला हा बॉम्ब वर्ल्ड वॉर 2 (Second World War) मधील असल्याचं सांगितलं जात आहे. लगेचच हा बॉम्ब डिफ्यूज करण्यात आला. ही घटना 2 डिसेंबरची असल्याचं सांगितलं जात आहे. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करताच सर्वांनाच धक्का बसला. घरात सफाई करत असताना घरामध्येच असलेल्या या बॉम्बवर या व्यक्तीची नजर गेली. बॉम्ब उभा करून ठेवण्यात आला होता. यामुळे तो थेट या व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये शिरला. वेदनेनं ओरडतच हा व्यक्ती लगेचच रुग्णालयात पोहोचला. त्याची अवस्था पाहून बॉम्ब डिफ्यूज करणाऱ्या टीमला बोलवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, हा बॉम्ब रॉयल आर्टिलरीद्वारे सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये वापरला गेला होता. नंतर हा नॉर्थ अफ्रिकेत ब्रिटिश टँक्सनेही वापरला. हा जवळपास 57 mm गोलाकार आणि 170 mm लांब असतो. द सनला मिळालेल्या माहितीनुसार, सफाई करत असताना या व्यक्तीने हे सेल बाजूला उचलून ठेवलं, मात्र इतक्यात त्याचा पाय घसरला आणि तो यावरच पडला. जेव्हा हा व्यक्ती रुग्णालयात आला तेव्हा ते दृश्य पाहून डॉक्टरही हादरले. त्यांनी तात्काळ बॉम्बविरोधी पथकाला पाचारण करून खात्री केली. त्यानंतर स्थानिक पोलीसही रुग्णालयात पोहोचले. यानंतर स्फोटक बाहेर काढून तातडीने निकामी करण्यात आले. या घटनेनंतर त्या व्यक्तीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, व्यक्तीला बरे होण्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र, ही बाब मीडियासमोर येताच व्हायरल झाली.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Bomb Blast, PRIVATE part

    पुढील बातम्या