मराठी बातम्या /बातम्या /Viral /झोपलेल्या महिलेच्या तोंडातून पोटात शिरला साप; डॉक्टर ओढून बाहेर काढायला गेले, अन्.. Shocking Video

झोपलेल्या महिलेच्या तोंडातून पोटात शिरला साप; डॉक्टर ओढून बाहेर काढायला गेले, अन्.. Shocking Video

एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये बेशुद्ध पडलेली दिसत आहे, तिच्या तोंडातून डॉक्टर काहीतरी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यानंतरच डॉक्टरांनी 4 फूट लांब साप बाहेर काढला.

एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये बेशुद्ध पडलेली दिसत आहे, तिच्या तोंडातून डॉक्टर काहीतरी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यानंतरच डॉक्टरांनी 4 फूट लांब साप बाहेर काढला.

एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये बेशुद्ध पडलेली दिसत आहे, तिच्या तोंडातून डॉक्टर काहीतरी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यानंतरच डॉक्टरांनी 4 फूट लांब साप बाहेर काढला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 05 मार्च : साप हा असा जीव आहे, की त्याचं नाव ऐकताच कोणीही घाबरून जातो. समोर आला तर तो घाबरून जातो. साप असा प्राणी आहे जो कधीही आणि कुठेही लपू शकतो. तो कपड्यांमध्ये, बुटांमध्ये, लहान बिळांमध्ये, कपाटांमध्ये, घराच्या कोपऱ्यात लपतो आणि सर्वत्र बसतो. मात्र यावेळी एका सापाने मर्यादा ओलांडली. 4 फूट लांबीचा साप तोंडातून चक्क महिलेच्या पोटात शिरला.

झोपलेल्या महिलेच्या अंगावर बसला भलामोठा कोब्रा; मग फणा काढला अन्.., काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

ट्विटरच्या @FascinateFlix या अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये महिलेच्या पोटातून साप बाहेर पडत असल्याचं पाहून तुम्ही थक्क व्हाल. गाढ झोपेत असलेल्या महिलेच्या तोंडात एक साप घुसला आणि तो तिच्या पोटात गेल्याचं सांगण्यात आलं. नंतर डॉक्टरांनी सापाला बाहेर काढलं आणि चार फूट साप पाहून डॉक्टरांची टीमही थक्क झाली. या व्हिडिओला 19 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हायरल व्हिडिओ खरोखरच थक्क करणारा आहे. जो पाहून कुणालाही डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण होईल. व्हिडिओमध्ये, एक महिला ऑपरेशन थिएटरमध्ये बेशुद्ध पडलेली दिसत आहे, तिच्या तोंडातून डॉक्टर काहीतरी काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यानंतरच डॉक्टरांनी 4 फूट लांब साप बाहेर काढला. हे पाहून डॉक्टरही आश्चर्याने दोन पावले मागे सरले. या व्हिडिओनं लोकांना आश्चर्य वाटलं की एखादी व्यक्ती इतकी गाढ कशी झोपू शकते की त्याच्या तोंडात साप जातो आणि त्याला ते कळतही नाही.

ही घटना जवळपास 2 वर्ष जुनी आहे. असं सांगण्यात आलं की, रशियातील दागेस्तान भागातील एका छोट्या गावात ही महिला इतकी गाढ झोपली होती की तिच्या तोंडातून एक साप तिच्या पोटात शिरला. तिला थोडा त्रास जाणवल्याने महिला डॉक्टरकडे गेली. यानंतर सर्व तपासाअंती डॉक्टरांनी पोटातून 4 फूट लांब साप बाहेर काढला. मात्र, रिपोर्टनुसार, हा साप जिवंत होता की मेला होता हे कळू शकलं नाही. तसंच महिलेची ओळखही उघड करण्यात आली नाही. अनेकांनी हा साप नसून दुसरा प्राणी असल्याचं सांगितलं. जे लांब गांडुळासारखं आहे. हे एखाद्या विषाणूच्या माध्यमातून पोटातच जन्माला येतात. व्हिडिओला 19 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत

First published:
top videos

    Tags: Shocking video viral, Snake video