Home /News /viral /

आयुष्यभर पुरुष म्हणून जगला 3 मुलांचा पिता; वयाच्या 67व्या वर्षी झाला धक्कादायक खुलासा

आयुष्यभर पुरुष म्हणून जगला 3 मुलांचा पिता; वयाच्या 67व्या वर्षी झाला धक्कादायक खुलासा

67 वर्षीय व्यक्तीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने ते रुग्णलायत गेले. डॉक्टरांना वाटलं की त्यांना हर्नियाचा त्रास असेल, यामुळे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  नवी दिल्ली 24 जानेवारी : माणसाचं शरीर अतिशय विचित्र असतं (Facts About Human Body). याबद्दल पूर्णपणे जाणून घेणं, कदाचित डॉक्टरांनाही शक्य होत नाही. अनेकदा तर माणसाच्या शरीराबद्दल अशा काही घटना ऐकायला मिळतात, ज्या सगळ्यांनाच आश्चर्यचकित करतात. सध्या एका व्यक्तीसोबत घडलेली अशीच एक घटना चर्चेत आहे. हा व्यक्ती ऑपरेशन करण्यासाठी रुग्णालयात गेला, मात्र डॉक्टरांना त्याच्या शरीरात महिलांचा अवयव आढळला (Female Genitalia in Man’s Body). आंधळं प्रेम! बॉयफ्रेंडसाठी दान केली किडनी; 10 महिन्यातच तरुणीला मिळाला धोका कोसोवो येथे राहणाऱ्या 67 वर्षीय व्यक्तीच्या अचानक पोटात दुखू लागल्याने ते रुग्णलायत गेले. डॉक्टरांना वाटलं की त्यांना हर्नियाचा त्रास असेल, यामुळे ऑपरेशन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांना या व्यक्तीच्या शरीरात गर्भाशय, फॅलोपियन ट्यूब आणि अंडाशय आढळून आलं (Doctors Found Womb and Ovary in Man's Body). हे पाहून डॉक्टरही थक्क झाले. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी सांगितलं की या व्यक्तीच्या शरीरात पुरुषासह महिलेचेही अवयव होते. शरीराच्या बाहेर केवळ पुरुषाचा अवयव दिसत होता आणि याच्याबरोबर वरच्या बाजूला पोट वरती आलं होतं, मात्र हे पाहून या व्यक्तीला हर्निया असल्याचा अंदाज लावला गेला होता. परंतु टेस्टमध्ये समोर आलं की या व्यक्तीच्या शरीरात महिलांचे अवयवही असल्याने हे असं दिसत आहे.

  एकसोबतच 20 महिलांना डेट करत होता व्यक्ती; एका व्हिडिओमुळे फुटलं बिंग

  डॉक्टरांनी सांगितलं की हा व्यक्ती नेहमी पुरुषाचं आयुष्य जगला. ज्या लोकांना जन्मापासूनच स्त्री आणि पुरुष या दोघांचे अवयव असतात, त्यांना शक्यतो मुलं होत नाहीत. मात्र, या व्यक्तीला ३ मुलं आहे, हे जाणून डॉक्टरही हैराण झाले. या रुग्णाला केवळ एकच अंडाशय होतं, मात्र तरीही त्याला कोणत्या समस्या आल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, सहसा अशा केसमध्ये डॉक्टर जन्मानंतरच मुलाचा एक अवयव काढून टाकतात. मात्र, याबाबत प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: PRIVATE part, Shocking news

  पुढील बातम्या