मराठी बातम्या /बातम्या /Viral /

मायग्रेन समजून त्रासाकडे दुर्लक्ष करत राहिली महिला; सत्य समोर येताच सरकली पायाखालची जमीन

मायग्रेन समजून त्रासाकडे दुर्लक्ष करत राहिली महिला; सत्य समोर येताच सरकली पायाखालची जमीन

43 वर्षीय क्लिअर शिप हिच्या हाताची बोटं अचानक सुन्न झाली. हाताने कामही करता येणं बंद झाल्यावर ती डॉक्टरांकडे गेली

43 वर्षीय क्लिअर शिप हिच्या हाताची बोटं अचानक सुन्न झाली. हाताने कामही करता येणं बंद झाल्यावर ती डॉक्टरांकडे गेली

43 वर्षीय क्लिअर शिप हिच्या हाताची बोटं अचानक सुन्न झाली. हाताने कामही करता येणं बंद झाल्यावर ती डॉक्टरांकडे गेली

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 07 मार्च : शरीरात कधी, कोणता आजार कसा प्रवेश करेल हे सांगता येत नाही. भरपूर काळजी घेऊनही अनेकदा लोकांनी गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. अनेक आजार असे असतात ज्यात डॉक्टर आणि पैसेही कामी येत नाहीत. मात्र, तरीही माणसाने प्रयत्न सोडू नये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरात जाणवणारे अजब बदल आणि छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं अनेकदा मोठ्या समस्या समोर घेऊन येतं. इंग्लंडमधील ल्युटन येथील 43 वर्षीय क्लिअर शिप या महिलेसोबतचही असंच घडलं. तिच्या हाताची बोटं अचानक सुन्न झाली. हाताने कामही करता येणं बंद झाल्यावर ती डॉक्टरांकडे गेली, तिथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला कार्पल टनल सिंड्रोम (Carpal tunnel syndrome) असल्याचं सांगितलं. मात्र पुढच्याच क्षणी तिच्यासोबत काहीतरी वेगळंच घडू लागलं, ते पाहून ती घाबरली. या नवीन लक्षणांमध्ये गंभीर आजाराचे संकेत लपलेले होते, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास ते प्राणघातक ठरू शकत होतं. ती वेगाने वाढणाऱ्या आणि उपचार शक्य नसलेल्या ब्रेन ट्यूमरने ग्रस्त होती.

बाळाला कडेवर घेतलेलं असतानाच घसरला पाय अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

बोटांनंतर तिचा चेहराही सुन्न पडू लागला आणि तिचं सिटी स्कॅन करावं लागलं. यात समजलं की तिला ब्रेन ट्यूमर (Brain Tumor) आहे. जो अगदी वेगाने वाढत आहे आणि त्यावर उपचारही शक्य नाही. हे ऐकताच क्लिअर सदम्यात गेली. कारण याआधी तिची फक्त बोटं सुन्न पडत असे, याशिवाय तिला काहीच समस्या नव्हती. शरीरात तिला थोड्या वेदना जाणवल्या मात्र डॉक्टरांनी सांगितलं की हे मायग्रेन असून शकतं आणि ते नंतर बरंही झालं. मात्र ब्रेन ट्यूमरबद्दल ऐकून ती हादरली. तिला लंडनच्या नॅशनल हॉस्पिलटल ऑफ न्युरोलॉजी अॅण्ड न्यूरोसर्जरीमध्ये रेफर करण्यात आलं. जिथे तिला ग्रेड चार अॅस्ट्रोसाइटोमा असल्याची पुष्टी झाली. ही एक कर्करोगजन्य मेंदूची वाढ होती जी मणक्यावरदेखील परिणाम करू शकते. त्यानंतर डॉक्टरांनी लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं. क्लिअरची लगेचच सर्जरी केली गेली आणि यादरम्यान तिला जागं ठेवण्यात आलं जेणेकरून तिच्या मेंदूच्या स्थितीवर सतत लक्ष ठेवता येईल. सोबतच सर्जरी करताना तिच्या मेंदूची एखादी चुकीची महत्त्वाची नस कापली जाणार नाही.

अजबच! खेळण्यातील विमानाच्या प्रेमात पडलीये 28 वर्षीय तरुणी; असा करते रोमान्स

सर्जरी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी पूर्ण ट्यूमर काढला आहे. मात्र अजूनही तिला पुन्हा कॅन्सर होण्याची शक्यता आहे. अशात क्लिअरच्या डोळ्यासमोर तिच्या 9 वर्षाच्या मुलाचा चेहरा येतो. तिचा मुलगा तिच्या सर्वात जास्त जवळ आहे. ती फक्त आपल्या मुलासाठी या आजारासोबत संघर्ष करत आहे आणि स्वतःला लवकर बरं करण्यासाठी मेहनत करत आहे.
First published:

Tags: Rare disease, Serious diseases

पुढील बातम्या