मराठी बातम्या /बातम्या /Viral /Shocking! व्यक्तीच्या कानातून येत होते अजब आवाज; आतमध्ये डॉक्टरांना दिसला भलताच जीव

Shocking! व्यक्तीच्या कानातून येत होते अजब आवाज; आतमध्ये डॉक्टरांना दिसला भलताच जीव

स्विमिंग करून परतल्यानंतर या व्यक्तीच्या कानात वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केलं, मात्र नंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता सत्य जाणून डॉक्टरही (Doctor) थक्क झाले

स्विमिंग करून परतल्यानंतर या व्यक्तीच्या कानात वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केलं, मात्र नंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता सत्य जाणून डॉक्टरही (Doctor) थक्क झाले

स्विमिंग करून परतल्यानंतर या व्यक्तीच्या कानात वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केलं, मात्र नंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता सत्य जाणून डॉक्टरही (Doctor) थक्क झाले

नवी दिल्ली 14 जानेवारी : अनेकदा आपल्या शरीरात अशा काही विचित्र गोष्टी (Weird Things) आढळतात, ज्याबद्दल आपण विचारही केलेला नसतो. न्यूझीलंडच्या एका व्यक्तीसोबतही असंच घडलं. स्विमिंग करून परतल्यानंतर या व्यक्तीच्या कानात वेदना होऊ लागल्या. सुरुवातीला त्याने याकडे दुर्लक्ष केलं, मात्र नंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता सत्य जाणून डॉक्टरही (Doctor) थक्क झाले.

शरीरावर कमी की काय म्हणून डोळ्यातही टॅटू करायला गेली; मॉडेलची झाली भयानक अवस्था

ही घटना न्यूझीलंडच्या ऑकलँड येथील आहे. इथे राहणाऱ्या जेन वेडिंग नावाच्या व्यक्तीला स्विमिंग करून आल्यानंतर अजब वाटू लागलं. त्याच्या कानात वेदना होत होत्या आणि काहीतरी कानात असल्याचंही त्याला वाटत होतं. हळूहळू या वेदना आणखीच वाढत गेल्या आणि त्याला ऐकू येणंही जवळपास बंद झालं (Cockroach Found in Ear of a Man). अखेर जास्तच त्रास होऊ लागल्याने तो डॉक्टरकडे गेला.

डॉक्टरांनी या व्यक्तीला काही अँटीबायोटिक्स दिल्या आणि कान सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनाही वाटलं की स्विमिंगमुळे या व्यक्तीच्या कानात पाणी गेलं असावं. मात्र, जेनच्या कानातील वेदना आणखीच वाढत गेल्याने तो दुसऱ्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी तपासणी केली असता जेनच्या कानात एक मृत झुरळ अडकलेलं दिसलं, याचमुळे त्याच्या कानात वेदना होत होत्या. हे झुरळ कानातून बाहेर काढण्यासाठी डॉक्टरांना भरपूर मेहनत घ्यावी लागली.

VIDEO : धबधब्याजवळ गर्लफ्रेंडला करणार होता प्रपोज; तेव्हाच घडली भयंकर दुर्घटना

डॉक्टरांनी जेनच्या कानातून झुरळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता कानातून त्याचा केवळ अर्धा भागच बाहेर निघाला. बाकीचा भाग मशीनच्या मदतीने बाहेर काढण्यात आला. विशेषतज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे झुरळ आणखी काही दिवस जेनच्या कानात राहीलं असतं तर त्याला ट्यूमरही होऊ शकत होता. न्यूझीलंड हेराल्डनुसार, डॉक्टरांनी याआधी कधीही अशी केस पाहिली नव्हती. सध्या जेन ठीक आहे.

First published:
top videos

    Tags: Shocking news, Surgery