मराठी बातम्या /बातम्या /Viral /डॉक्टरची भयानक लव्ह स्टोरी! 7 वर्ष प्रेयसीचा मृतदेह सांभाळला, शारिरिक संबंधही ठेवले

डॉक्टरची भयानक लव्ह स्टोरी! 7 वर्ष प्रेयसीचा मृतदेह सांभाळला, शारिरिक संबंधही ठेवले

डॉक्टरची सणकी प्रेम कहाणी

डॉक्टरची सणकी प्रेम कहाणी

आज आम्ही तुम्हाला एका डॉक्टरच्या अशाच प्रेमकथेविषयी सांगणार आहोत. अमेरिकेतील हा डॉक्टर विवाहित असूनही एका महिलेच्या प्रेमात आकंठ बुडाला.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 14 मार्च : प्रेम ही सहजसुलभ भावना असते. एखादी व्यक्ती प्रेमात आकंठ बुडाल्याचं आपण पाहतो. पण असं प्रेम काहीवेळा एका वेगळ्याच वळणावर पोहोचतं. आज आम्ही तुम्हाला एका डॉक्टरच्या अशाच प्रेमकथेविषयी सांगणार आहोत. अमेरिकेतील हा डॉक्टर विवाहित असूनही एका महिलेच्या प्रेमात आकंठ बुडाला. या महिलेला एक गंभीर आजार झाला होता. या डॉक्टरने तिला पत्नी मानून स्वखर्चातून तिच्यावर उपचार केले. पण तिचा आजारामुळे मृत्यू झाला. या डॉक्टरने तिची कबर बांधली. तिच्या मृत्यूमुळे डॉक्टर मानसिकदृष्ट्या खचला. तो रोज तिच्या कबरीजवळ बसून राहत असे. कालांतराने त्याने तिचा मृतदेह पुन्हा कबरीबाहेर काढून त्यावर मेणानं प्रक्रिया केली. वास येऊ नये म्हणून त्यावर महागडे परफ्युम शिंपडले. आता डॉक्टर रोज त्या मृतदेहाशी बोलत बसायचा, नृ्त्य करायचा आणि त्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा. पण एकेदिवशी डॉक्टराचे हे कृत्य जगासमोर आले. या डॉक्टरची ही विचित्र प्रेमकथा नेमकी कशी आहे, ते जाणून घेऊया.

  डॉ. कार्ल टेंजलरची प्रेम कहाणी काहीशी विचित्र आहे. कार्लचा जन्म 8 फेब्रुवारी 1877 मध्ये जर्मनीतील ड्रेसडन येथे झाला. त्याने वैद्यकीय शिक्षण घेतले होते. पहिल्या जागतिक महायुद्धानंतर 1926 मध्ये कार्ल अमेरिकेत आला. तिथं तो काउंट कार्ल वॉन कोसेल नावानं ओळखला जाऊ लागला. मी अनेक विद्यापीठातून पदव्या मिळवल्या आहेत, असा दावा तो करायचा. त्याचप्रमाणे माझं लहानपण राजमहालात गेलं आहे. मी खूप बुद्धिमान आहे, असंदेखील तो सांगायचा. मात्र कालांतराने कार्लचं प्रेमप्रकरण जगासमोर आलं आणि त्याला त्यातून खूप प्रसिद्धी मिळाली.

  `द सन`ने दिलेल्या माहितीनुसार, जर्मनीतून अमेरिकेत आल्यानंतर कार्ल फ्लोरिडातील मरिन हॉस्पिटलमध्ये एक्स-रे टेक्निशियन म्हणून काम करू लागला. कार्लला लहानपणापासून एक स्वप्न पडायचे. त्यात सुंदर आणि लांबसडक केसांची एक तरुणी त्याला दिसायची. त्याचप्रमाणे त्याच्या स्वप्नात त्याची एक पूर्वज महिला येत असे. ही तरुणी तुझं खरं प्रेम आहे, असं ती पूर्वज महिला कार्लला स्वप्नात येऊन सांगायची. वारंवार असं स्वप्न पडत असल्याने त्याने ही तरुणीच आपलं खरं प्रेम आहे, असं मानायला सुरुवात केली.

  22 एप्रिल 1930 रोजी तो हॉस्पिटलमध्ये काम करत असताना त्याच्याकडे एलेना हेलेन नावाची टीबी झालेली महिला रुग्ण आली. एलेनाला पाहून कार्लला क्षणभर धक्का बसला. कारण त्याच्या स्वप्नातील तरुणी आणि एलेना या दोघी सारख्याच दिसणाऱ्या होत्या. कार्ल पहिल्या नजरेतच एलेनाच्या प्रेमात पडला. डॉ. कार्लने एलेनावर उपचार सुरू केले. उपचारांसाठी एलेना वारंवार हॉस्पिटलमध्ये येऊ लागली. एकेदिवशी कार्लने त्याच्या स्वप्नाविषयी एलेनाला सांगितले. पण मी विवाहित आहे, असं एलेनाने त्याला सांगितलं. विवाहानंतर माझा गर्भपात झाल्याने पतीने मला सोडून दिलं. त्यामुळे मी आई-वडिलांसोबत राहते, असं एलेनाने कार्लला सांगितलं. 1909 मध्ये जन्मलेली एलेना कार्ल पेक्षा 32 वर्षांनी लहान होती. वयात मोठं अंतर असूनही कार्ल तिच्या प्रेमात पडला. मनातून तो तिला पत्नी मानू लागला. त्या काळी टीबीवर ठोस उपचार नसल्याने हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी तिला घरीच आराम करण्याचा सल्ला दिला. कार्लने एलेनाच्या घरी जाऊन तुझे सर्व उपचार माझ्या खर्चाने आणि घरीच करतो असं सांगितलं. एलेनाच्या पालकांनी त्यास होकार दिला.

  कार्ल उपचारांसाठी लागणारी यंत्र, औषधं हॉस्पिटलमधून चोरी करायाचा. पण प्रयत्न करूनही एलेना वाचू शकली नाही. 25 ऑक्टोबर 1931 रोजी एलेनाचा मृत्यू झाला. एलेनाच्या मृत्यूमुळे कार्लला मोठा झटका बसला. तिच्या अंत्यसंस्काराचा सर्व खर्च मी करणार, अशी विनंती कार्लने एलेनाच्या पालकांना केली. त्याने एलेनासाठी एक मोठी कबर बांधली. कबरीत वीज आणि इंटरकॉम बसवले. कबरीची एक चावी त्याने स्वतःजवळ ठेवली. तुम्ही जेव्हा एलेनाच्या कबरीजवळ याल तेव्हा बाहेरूनच तिला पाहून निघून जायचं असं त्याने एलेनाच्या पालकांना सांगितलं. डॉक्टर कार्ल अजूनही एलेनाच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की तो रोज रात्री कबरीत जाऊन तासनतास तिच्याजवळ बसायचा. तिच्याशी एकटाच बोलायचा. एलेनाच्या आई-वडिलांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांना जबर धक्का बसला.

  दरम्यान, दोन वर्षांनंतर कार्लच्या स्वप्नात त्याची पूर्वज महिला येऊ लागली. एलेनाला तू घरी घेऊन ये आणि तुझ्याजवळ ठेव असं ती महिला कार्लला सांगत होती. कार्लने तिचं म्हणणं ग्राह्य मानून एप्रिल 1933 मध्ये कबर खोदून एलेनाचा सडलेला मृतदेह बाहेर काढला आणि तो घरी आणला. कार्लचे हे कृत्य कोणाला ही समजले नाही. मृतदेह सडल्याने त्याचा घरभर वास सुटला होता. या मृतदेहाला नवीन शरीर द्यायचा विचार कार्लच्या मनात आला. त्याने मेणाच्या मदतीनं एलेनाचं शरीर बनवायला सुरूवात केली. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने चेहरा तयार केला. डोळ्यांवर दोन काचेचे तुकडे लावले. डोक्यावर विग लावला. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून सर्वत्र परफ्युम फवारले. डॉक्टर रोज तासनतास मृतदेहाशी बोलत बसायचा. मृतदेहासोबत नृत्य करायचा. तो तिला पत्नी मानू लागला. यात सात वर्ष निघून गेली. सात वर्षांनंतर एकेदिवशी एलेनाच्या बहिणीला कार्लवर संशय आला.

  कार्ल आता एलेनाच्या कबरीजवळ का येत नाही असा प्रश्न तिला पडला. त्यामुळे ती एकेदिवशी अचानक कार्लला भेटायला त्याच्या घरी गेली. पण घरातील वातावरण आणि सर्व स्थिती पाहून तिला जबर धक्का बसला. कार्ल घरात ठेवलेल्या मृतदेहाशी बोलत असल्याचं तिला दिसलं. तिनं याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार्लला अनेक प्रश्न विचारले. पण हा प्रकार पाहून पोलिसांनादेखील धक्का बसला. पोलिसांनी कार्लला अटक केली. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन केलं असता त्यात योनीच्या आकाराची एक पेपर ट्यूब मिळाली. त्यावरून कार्ल हा केवळ मृतदेहासोबत झोपत नव्हता तर त्याने त्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते, असा दावा करण्यात आला. पोलिसांनी कार्लला न्यायालयात हजर केलं असता त्याला कोणतीही शिक्षा देण्यात आली नाही. कारण अशा गुन्ह्यासाठी कोणत्याही शिक्षेची तरतूद नव्हती.

  त्यानंतर एलेनाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांनी कार्लला न सांगता दफन केला. त्यानंतर डॉक्टर कार्ल मरेपर्यंत एलेनाची कबर शोधत राहिला; पण त्याला ती सापडली नाही.

  दरम्यान, एलेनाच्या प्रेमात पडण्यापूर्वी डॉक्टर कार्लचा 1899 मध्ये डोरिस शेफर नावाच्या महिलेशी विवाह झाला होता. त्यांना आयेशा आणि क्लारिस्टा नावाची दोन मुलंदेखील होती. पण तू माझं खरं प्रेम नाहीस तर स्वप्नातील तरुणी माझं खरं प्रेम आहे, असं कार्ल त्याच्या पत्नीला वारंवार सांगत असे. त्यानंतर 1926 मध्ये कार्ल पत्नी आणि दोन मुलांना सोडून नोकरीच्या निमित्ताने जर्मनीतून अमेरिकेत स्थायिक झाला होता. अशा विचित्र प्रेम कहाणीचा वेडसर नायक असलेल्या कार्लचा 3 जुलै 1952 रोजी मृत्यू झाला.

  First published: