Home /News /viral /

फटाके फोडण्याचा आनंद लुटण्यासाठी अजब जुगाड, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

फटाके फोडण्याचा आनंद लुटण्यासाठी अजब जुगाड, VIDEO पाहून बसेल आश्चर्याचा धक्का

दिनेश वैष्णव नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला असून याला अविष्कार म्हटलं आहे.

    मुंबई, 11 नोव्हेंबर : दिवाळीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची मागणी असते. खासकरून लहान मुलांमध्ये फटाक्यांची जास्त क्रेझ असते. गेली अनेक दशकं भारतात दिवाळीला फटाके वाजवण्याची पद्धत रूढ आहे. ती परंपरेचा भाग होऊ पहात आहे. परंतु कोरोना व्हायरस आणि दिल्लीतील खराब हवा आणि प्रदूषणामुळे दिल्लीतील नागरिकांना या दिवाळीत फटाके फोडता येणार नाहीत. त्याचबरोबर अनेक राज्यांत दिवाळीला फटाके न उडवण्याचं आवाहन करण्यात आलंय किंवा बंदी घालण्यात आली आहे. या सगळ्यात एक नवी युक्ती समोर आली आहे. यामध्ये फटाक्यांचा आवाज आणि आग दोन्ही असणार आहे. परंतु हे फटाके नाहीत. आश्चर्य वाटतंय ना? आज आम्ही तुम्हाला याच नवीन युक्तीविषयी माहिती सांगणार आहोत. फटाके नाहीत पण फुगे तर आहेत ना कोरोना व्हायरस आणि प्रदूषणच्या पार्श्वभूमीवर केवळ दिल्लीतच नव्हे तर राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिसा, सिक्कीममध्ये देखील फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओची तुम्हाला खूप मदत होऊ शकते. यामध्ये व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, फुग्यांची एक माळ तयार केली आहे. यामध्ये दोऱ्याला आग लावल्यानंतर हळूहळू ती फुग्यांपर्यंत पोहोचून आवाज होत फुगे फुटू लागतात. त्यामुळे हा आवाज तुम्हाला फटाके फुटल्यासारखाच येईल. या पद्धतीत फटाक्यांतील दारूने होणारं प्रदूषण, धूर हे सगळं टाळलं जातंय. हे वाचा-कथित लव्ह-जिहादच्या जाहिरातीनंतर Tanishq पुन्हा चर्चेत; सोशल मीडियावरुन टीका सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अनेकांना ही नवीन युक्ती खूप आवडत असून दिनेश वैष्णव नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ शेअर केला असून याला अविष्कार म्हटलं आहे. दिल्लीमध्ये नागरिकांनी ग्रीन फटाके फोडू देण्याची मागणी केली होती. परंतु अरविंद केजरीवाल सरकारने या फटाक्यांवर देखील बंदी घातली आहे. तर महाराष्ट्रात देखील फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आली नसल्याचे देखील स्पष्ट केले. त्याचबरोबर नागरिकांनी सामाजिक भान बाळगून फटाके फोडण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे. हे वाचा-15 सेकंदात टायगर झाल्या 4 मुली, वाचून आश्चर्य वाटत असेल तर पाहा VIDEO कर्नाटक सरकारची देखील बंदी शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात फटाकेबंदीचा निर्णय घेत असल्याचे म्हटले होते. या संदर्भात आम्ही चर्चा केली असून कोरोनाच्या संकटामुळं आणि प्रदूषणामुळे आम्ही फटाकेबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच सरकार आदेश जारी करणार आहे असंही त्यांनी सांगितलं.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Video viral

    पुढील बातम्या