जाऊ तिथं कचरा करू; अमेरिकेत दिवाळीला रस्त्यावर उडवले फटाके, आणि...

न्यू जर्सीतील इंडियन स्ट्रीटवर दिवाळीच्या जल्लोषानंतर रस्त्यावर फटाक्यांचा कचरा जमा झालेला दिसत होता.

News18 Lokmat | Updated On: Nov 1, 2019 10:23 AM IST

जाऊ तिथं कचरा करू; अमेरिकेत दिवाळीला रस्त्यावर उडवले फटाके, आणि...

जगभरात भारतीय राहतात. अमेरिकेत तर मोठ्या प्रमाणात भारतीय समुदाय राहतो. या सर्वांनी यंदा अगदी धुमधडाक्यात दिवाळी साजरी केली. अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी करण्यात आली. पण या सोहळ्यानंतर रस्त्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा झाला की तो चक्क पोलिसांनाच साफ करावा लागला. पोलीस रस्त्यावरचा कचरा साफ करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

न्यू जर्सीतील इंडियन स्ट्रीटवर दिवाळीच्या जल्लोषानंतर रस्त्यावर फटाक्यांचा कचरा जमा झालेला दिसत होता. यानंतर न्यू जर्सीचे पोलीस अधिकारी आले आणि त्यांनी लगेच कचरा साफ केला. व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, रस्त्याच्या बाजूला अनेक लोक उभे होते आणि पोलीस पाण्याने कचरा साफ करत होते. तसेच गाडीतून फिरत पोलीस अजून कुठे कचरा उरला आहे का तेही पाहत आहेत.

संध्या नावाच्या एका ट्विटर युझरने सोमवारी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं की, 'भारतीय म्हणून सांगायला लाज वाटते. जर्नल स्क्वायर न्यू जर्सीमध्ये इंडियन स्ट्रीटवर काल रात्री असं चित्र होतं. न्यू जर्सी पोलिसांना सलाम.. ज्यांनी अगदी संयमाने कचरा साफ केला.'

आतापर्यंत 70 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून 1 हजारहून जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला असून 600 हून अधिकांनी रिट्वीट केले आहेत. सोशल मीडियावर सध्या तिथल्या लोकांची मोठ्या प्रमाणात आलोचना केली जात आहे. एका युझरने लिहिले की, 'व्हिडीओसाठी धन्यवाद. ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे की, लोक तिथे उभे आहेत आणि कचरा साफ करत नाहीयेत.' तर दुसऱ्या एका युझरने लिहिले की, 'आपण कधी शिकणार की आपल्याला शिकायचंच नाहीये.'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 10:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...