• Home
  • »
  • News
  • »
  • viral
  • »
  • अमरावतीकरांचा थाट भारी, दिवाळीला खाण्यासाठी मिठाई सोनेरी, पाहा हा VIDEO

अमरावतीकरांचा थाट भारी, दिवाळीला खाण्यासाठी मिठाई सोनेरी, पाहा हा VIDEO

आता सोन्याचा वर्ख आणि तोही 24 कॅरेट असल्यावर भाव ही तसाच असणार आहे. तर या सोनेरी भोग मिठाईचा भाव हा फक्त 7 हजार रुपये किलो आहे.

  • Share this:
अमरावती, 12  नोव्हेंबर : दिवाळी निमित्ताने आता बाजारपेठा फुलून गेल्या आहे. सर्वत्र खरेदीची लगबग सुरू आहे. दिवाळी म्हटल्यावर फराळ आणि मिठाई तर आलीच. पण, जर सोन्याची मिठाई चाखायला मिळाली तर? दचकू नका, अमरावतीत पहिल्यांदाच चक्क सोन्याचा वर्ख असलेली मिठाई तयार करण्यात आली आहे. अमरावतीच्या नामांकित असलेल्या रघुवीर मिठाई यांनी यावर्षी शुद्ध सोनेरी वर्ख लावलेली "सोनेरी भोग" ही मिठाई बाजारात आणली आहे. विदर्भातीलच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांकरिता 'सोनेरी भोग' सोबत अन्य विविध प्रकारच्या मिठाई उपलब्ध करून दिल्या आहेत. पिस्ता, केसर आणि हेजलन्ट या ड्रायफ्रुटपासून ही मिठाई तयार करण्यात आली आहे. या मिठाईवर खास दिल्लीच्या नोएडा येथून मागवलेला सोन्याचा 24 कॅरेट सर्टिफिकेटसह वखर मिठाईवर लावलेला आहे. राजस्थानमधील खास कारागिरांनी ही विशेष मिठाई तयार केली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ही सोन्याची मिठाई खरेदी करण्यासाठी व पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. आता सोन्याचा वर्ख आणि तोही 24 कॅरेट असल्यावर भाव ही तसाच असणार आहे. तर या सोनेरी भोग मिठाईचा भाव हा फक्त 7 हजार रुपये किलो आहे. एवढी महागडी मिठाई कोण खाणार असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. पण, 'हौसे ला मोल नाही' असं म्हणतात, त्यामुळेच अमरावतीतील काही हौशी खवय्यांनी ही मिठाई विकत सुद्धा घरी नेली आहे. मागील वर्षी असाच प्रयोग पुणे आणि नाशिकमध्ये पाहण्यास मिळाला होता. पण, यंदा मात्र, विदर्भाने पहिली बाजी मारली आहे.
Published by:sachin Salve
First published: