भोपाळ 14 मार्च : प्रत्येक निर्णय न्यायालयातच घ्यावा लागेल असं नाही, अनेक निर्णय न्यायालयाबाहेरही घेतले जातात. असंच एक प्रकरण ग्वाल्हेरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या बाहेर पहायला मिळालं, जिथे दोन पत्नींनी त्यांच्या एका पतीलाच वाटून घेतलं. त्यांनी संमतीने त्याला तीन-तीन दिवस सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर आठवड्यातील 1 दिवस रविवार हा पतीला मनाने जगण्यासाठी दिला आहे.
समुपदेशक हरीश दिवाण यांनी सांगितलं की, 28 वर्षीय सीमाचं लग्न 2018 मध्ये हरियाणातील गुडगाव येथे काम करणाऱ्या इंजिनिअरशी झालं होतं. पती-पत्नी 2 वर्षे एकत्र राहत होते, त्यांना एक मुलगा देखील आहे. यानंतर लॉकडाऊनच्या परिस्थितीत पती सीमाला ग्वाल्हेरला सोडून गेला होता. त्यानंतर बराच काळ तो तिला घेण्यासाठी आला नाही. सीमा ग्वाल्हेरमध्ये असताना, त्या काळात इंजिनिअर पतीचे त्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिला सहकाऱ्यासोबत संबंध जुळले. हे नातं इतकं घट्ट झालं की दोघंही लिव्ह-इनमध्ये राहू लागले. यानंतर दोघांनीही लग्न केलं. इतकंच नाही तर दुसऱ्या पत्नीलाही एक मुलगी झाली.
हरीश दिवाण यांनी सांगितलं की, जेव्हा केस त्यांच्यासमोर आली तेव्हा त्यांना संपूर्ण प्रकरण समजलं आणि पती-पत्नीमध्ये अनेक वेळा समुपदेशनही झालं. यादरम्यान हरीशने महिलेला मेंटेनन्सच्या नावावर तुम्हाला ५००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळणार नाही, असं समजावून सांगितलं. तुमचं काय होईल आणि मुलालाही चांगलं भविष्य मिळू शकणार नाही. मुलही वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहील, असं ते म्हणाले. एवढंच नाही तर समुपदेशक हरीश यांनी महिलेच्या पतीशी फोनवर बोलून त्यालाही समजावून सांगितलं.
त्याचवेळी पती-पत्नीला एकत्र कौटुंबिक न्यायालयात बोलावण्यात आलं, तिथे न्यायालयात जाण्यापूर्वीच दोघांमध्ये तडजोड झाली. यादरम्यान समुपदेशक हरीश दिवाण यांनी न्यायालयात जाण्यापूर्वीच दोघांमध्ये समझोता केला. यामध्ये एका आठवड्यात पती पहिल्या पत्नीसोबत 3 दिवस आणि दुसऱ्या पत्नीसोबत 3 दिवस राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रविवारी तो त्याच्या इच्छेनुसार कुठेही राहू शकतो. इतकंच नाही तर त्याने दोन्ही पत्नींना गुरुग्राममध्येच स्वतंत्र फ्लॅट्स दिले आहेत, जेणेकरून तो वेळेवर दोघींसोबत राहू शकेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.