मराठी बातम्या /बातम्या /Viral /

3 हजार वर्षांपुर्वी लोक प्यायचे या भांड्यातून मध; सापडले नोक संस्कृतीचे पुरावे

3 हजार वर्षांपुर्वी लोक प्यायचे या भांड्यातून मध; सापडले नोक संस्कृतीचे पुरावे

पुरातन काळी देखील मधाला आहारात महत्वाचंस्थान होतं,हे यावरुन स्पष्ट होतं.

पुरातन काळी देखील मधाला आहारात महत्वाचंस्थान होतं,हे यावरुन स्पष्ट होतं.

पुरातन काळी देखील मधाला आहारात महत्वाचंस्थान होतं,हे यावरुन स्पष्ट होतं.

केपटाऊन,दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिकेला (South Africa)पुरातन संस्कृतींचा मोठा वारसा आहे. या खंडात अनेकदा झालेल्या उत्खननात या पुरातन संस्कृतींचे अवशेष आढळून आलेले आहेत. हे अवशेष पाहता या संस्कृती कला तसंच अन्य बाबींच्या अनुषंगाने किती समृध्द असतील याचा अंदाज येतो. त्यातही नोक संस्कृती (Nok Culture)ही त्यांच्या टेराकोटा या शिल्पांसाठी ओळखली जाते. ही शिल्प त्या काळातील कलेचा अव्दितीय नमुना म्हणावा लागेल. या संस्कृतीतील लोक त्याकाळी मधाचा (Honey)वापर करीत होते,असे पुरावे नुकतेच संशोधकांना आढळून आले आहेत. म्हणजेच पुरातन काळी देखील मधाला आहारात महत्वाचंस्थान होतं,हे यावरुन स्पष्ट होतं.

दक्षिण आफ्रिकेत उत्खननादरम्यान संशोधकांना 3500 वर्षंजुनंमध वापरासाठीचंभांडं(Honey Pot)सापडलंआहे. यामुळे या खंडात पुरातन काळीदेखील मधाचंसंकलन केलंजात असल्याचंस्पष्ट झालंआहे. युकेतील ब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या रसायन शास्त्रज्ञांच्या सहकार्याने जर्मनीतील गोथे युनिव्हर्सिटीच्या (Gothe University)पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी नोक संस्कृतीतील 3500 वर्षंजुन्या भांड्याचंपृथ्थकरण केलंअसता,त्यात मधाच्या मेणाचे (Honey Wax)अंश त्यांना सापडले आहेत. मध्य नायजेरियातील नोक संस्कृती ही इ.स.पू. 1500 मधील आणि कॉमन एरा (Common Era)सुरु होण्यापूर्वीची आणि लोह युगातील (Iron Era)आहेअसं संशोधकांचं मत आहे.आतापर्यंत उत्खननात त्यांच्या संस्कृतीचे जे अवशेष सापडले आहेत ते नायजेरियातील कदुना राज्यातील हॅम गावात पाहायला मिळतात. ही संस्कृतीआफ्रिकेतील सर्वांत पुरातन अलंकारिक कला असलेल्या टेराकोटा शिल्पांसाठी ओळखली जाते.

याबाबत गोथे युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक पीटर ब्रुनिंग म्हणाले की या संस्कृतीतील लोकांच्या दैनंदिन आहारात मधाचा समावेश होता,हे यातून स्पष्ट होतं. मात्र हीबाब अनपेक्षित आणिआफ्रिकेच्या सुरुवातीच्या इतिहास काळाच्या दृष्टिनीअनाकलनीय म्हणता येईल.

याविषयी बोलताना ब्रिस्टॉल युनिव्हर्सिटीच्या ज्युली डून म्हणाल्या की एथनोग्राफीक डेटाच्या माध्यमातून प्रागौतिहासिक मातीच्या भांड्यामुळे जैववैद्यकिय माहिती तसेच 3500 वर्षांपूर्वी मध वापरण्याचा दृष्टीकोन कसा होता,याचे उल्लेखनीय उदाहरण म्हणता येईल. याबाबतचे सविस्तर संशोधन नेचर कम्युनिकेशन (Nature Communication)या नियतकालिकात देण्यात आलंआहे.

या संशोधकांच्या पथकानं आता नोक लोकं पाळीव प्राण्यांचंसंगोपन कसंकरायचे याबाबत संशोधन सुरु केलं आहे. परंतु,तपासणी केलेल्या तुकड्यांमध्ये संशोधकांना एक तृतीयांश उच्च आण्विक लिपीडस आढळून आले. त्यामुळे हे मधाचंमेण (Honey Wax)असल्यालापुष्टी मिळाल्याचे संशोधकांनी सांगितलं. ज्या मधाचा वापर नोक संस्कृतीतील लोकांकडून केला जायचा अशा लिपीडपासून ते पुन्हातयारकरणंअशक्य आहे. बहुधा त्यांनी मधाचे पोळे गरम करुन त्यापासून मध वेगळाकेलाअसावा,असंसंशोधकांचंम्हणणंआहे.

First published:

Tags: Photo viral