मुंबई, 05 एप्रिल : सोशल मीडिया वर असे बरेच फोटो व्हायरल होत असतात जे पाहताच नेमकं काय बरोबर ते कळत नाही. सध्या असाच एक फोटो समोर आला आहे. ज्यात 3 नंबर शोधायचा आहे (Find 3 in picture). पण त्याचं योग्य उत्तर कोणीच देऊ शकलं नाही. पाहा तुम्हाला तरी याचं उत्तर येतं आहे का.
एरवी सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूशन (Optical Illusion) म्हणजे दृष्टी भ्रम करणारे फोटो व्हायरल होतात पण हा फोटो मात्र एकदम साधा आणि स्पष्ट आहे. एका मोबाईलच्या डायल स्क्रीनचा हा फोटो.
फोटो पाहू शकता ज्यात कीपॅडचा स्क्रीनशॉट आणि डायल पॅडवर काही नंबर दिसत आहेत. आता याचं चॅलेंज असं आहे की तुम्हाला यात 3 नंबर किती आहेत ते सांगायचं आहे. प्रत्येकाने याचं उत्तर वेगवेगळं दिलं आहे.
पहिल्यांदा बहुतेक लोकानी याचं उत्तर चुकीचं दिलं आहे. कुणी 15, कुणी 18 तर कुणी 21 म्हटलं आहे.

तुम्ही फोटो पाहाल तर तुमचं लक्ष आधी फक्त मोठ्या 3 कडेच जाईल. पण त्यासोबत स्क्रिनवर टाइम आणि बॅटरी पर्सेंटमध्येही 3 आहेत.
हे वाचा - म्हणे, 'देशाची फौज वाढवणारी देशभक्त बायको हवी'; बेरोजगार डॉक्टरची Matrimonial Ad Viral
सर्वात महत्त्वाचं म्हणजे यात काही छुपे 3 आहेत जे सहजासहजी दिसत नाहीत. डायल केलेल्या नंबर च्या खाली जिथे कोणाचं तरी नाव असल्यासारखं दिसत आहे. त्यात तीन 3 आहे. तर कीपॅडवर 4 क्रमांकाच्या खाली जिथे काही अल्फाबेट आहेत तिथे I च्या जागी 3 आहे. म्हणजे एकूण 19 वेळा 3 दिसत आहेत.
काही लोकांनी तर फक्त 3 हा आकडा नाही तर या फोटोत हायलाईट केलेल्या 3 दिसणार्या गोष्टीही पकडल्या आहेत त्यात वायफायच त्याच्या शेजारी दिसणारे 3 बिंदू यांचाही समावेश आहे.
हे वाचा - चिमुकलीचं Aadhar Card पाहताच शिक्षक हादरले, प्रशासन हैराण; शाळेतही प्रवेश नाकारला
त्यामुळे या फोटोत नेमके किती 3 याचं उत्तर आता तुम्हीच द्या. आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या. आणि तुमच्या जवळच्या व्यक्तीला, नातेवाईकांना किंवा मित्रमंडळींना ही बातमी शेअर करून हे चॅलेंज नक्की द्या. तुमच्या प्रमाणे तेसुद्धा जीनियस आहेत का ते पाहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.