मुंबई, 08 मे : सोशल मीडियावर व्हिडीओप्रमाणे फोटोही व्हायरल होत असतात. काही फोटो हे असे असतात ज्यात जसं दिसतं तसं नसतं आणि जे प्रत्यक्षात असतं ते दिसत नाही. ज्यामुळे नेमकं या फोटोत काय आहे किंवा हा फोटो कसा आहे, यामुळे गोंधळ उडतो. असाच एक फोटो सध्या तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामुळे कन्फ्युझन आणि फक्त कन्फ्युझनच झालं आहे.
या फोटोत एक तरुण आणि तरुणी दिसत आहे. दोघांपैकी एक खुर्चीवर बसलं आहे आणि एक उभं आहे. खुर्चीत बसलेल्या व्यक्तीने चेक्सचं शर्ट घातलं आहे. तर उभ्या व्यक्तीने ब्लू कलरचं शर्ट. दोघंही हसत हसत एकमेकांना मिठी मारताना दिसत आहे. एकाचं डोकं दुसऱ्याच्या खांद्यावर गेलं आहे. पण यानंतर ते अशा पोझिशनमध्ये आहेत ज्यामुळे पण कोण उभं आहे आणि कोण बसलं आहे? कुणाचं डोकं कुणाच्या खांद्यावर आहे? तेच या फोटोत समजत नाही आहे. त्यांचे कपडेही असे आहेत की त्यावरूनही काही अंदाज लावता येत नाही आहे.
हे वाचा - कसं शक्य आहे? ना डाएट, ना एक्सरसाईझ; तरी फक्त 2 दिवसांतच याने बनवले 6 Pack abs
फोटो तुम्ही नीट पाहिलं तर कधी महिला खुर्चीत बसलेली आणि पुरुष उभा वाटतो. तर कधी पुरुष खुर्चीत बसलेला आणि महिला उभी असल्यासारखं वाटतं. आता तुम्हाला नेमकं काय वाटतं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन सांगा आणि त्यानंतर तुमचं उत्तर योग्य आहे की नाही ते तपासा.

आता तुम्ही जो या फोटोबाबत अंदाज बांधला किंवा तुम्हाला वाटतं की हे उत्तर योग्य असावं, तर मग पाहूयात नेमकं काय सत्य आहे. तुम्ही जेव्हा हा फोटो पूर्ण पाहाल तेव्हा तुमचं कन्फ्युझन दूर होईल.
हे वाचा - Wow! फक्त Burger-Sandwitch खाण्यासाठी महिन्याला 94 हजार रुपये पगार; कुठे आहे हा Dream Job पाहा
पूर्ण फोटो पाहिल्यानंतर उभी असलेली व्यक्ती ही तरुणी आणि खुर्चीत बसलेला तरुण असल्याचं स्पष्ट दिसतं. खुर्चीच्या मागे उभी असलेली तरुणी व्हाइट पँट आणि हिल्स घालून आहे. तिने आपलं डोकं त्या तरुणाच्या खांद्यावर ठेवलं आहे. तिचे केस मोकळे आहेत. ज्यामुळे ती नेमकी खुर्चीत आहे की उभी आहे, हे सुरुवातीच्या फोटोत नीट समजत नाही. पण या फोटोत मात्र हे स्पष्ट होतं.
आता ही बातमी तुम्ही इतरांना शेअर करा आणि त्यांनाही हे फोटो चॅलेंज द्या. पाहा त्यांना तरी योग्य उत्तर देता येतं आहे का ते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.