मराठी बातम्या /बातम्या /Viral /

जंगलात लाकडं तोडायला गेली अन् झाली लाखोंची कमाई, एका गोष्टीने झाला चमत्कार!

जंगलात लाकडं तोडायला गेली अन् झाली लाखोंची कमाई, एका गोष्टीने झाला चमत्कार!

महिलेचं नशीबच पालटलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai, India
  • Published by:  Meenal Gangurde

भोपाळ, 28 जुलै : मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातून एक महिला रस्त्यातून जाता जाता लक्षाधीश झाली आहे. गेंदाबाई नावाची आदिवासी महिला जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेली होती. तिला रस्त्यात एक अनमोल 4 कॅरेट 39 सेंटचा हिरा सापडला. जो तिने हिरा कार्यालयात जमा केला आहे. या हिऱ्याची किंमत साधारण 20 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आबे. सध्या या हिऱ्याची बोली लावण्यात येणार आहे.

गेंदा बाई पन्नानगरमधील पुरुषोत्तमपूरच्या वॉर्ड 27 मध्ये राहते. नेहमीप्रमाणे बुधवारीही ती लाकडं आणण्यासाठी जंगलात गेली होती. रस्त्यात तिला एक चमचमणारा दगड दिसला. तिने तो घेतला आणि घरी येऊन पतीला दाखवला.

त्यावेळी पती-पत्नी तो चमकणारा दगड ओळखू शकले नाही. ते दोघे थेट हिरा कार्यालयात पोहोचले. हिरा पारखीने सांगितलं की, हा साधारण दगड नाही तर महागडा हिरा आहे. याचं वजन 4 कॅरेट 39 सेंट आहे.

गेंदा बाईने सांगितलं की, घरातील परिस्थिती हलाखीची आहे. लाकडं विकून आणि मजुरी करून आम्ही घर चालवतो. चार मुलं आणि दोन मुलींची लग्न करायची आहेत. आता हिऱ्यांमधून मिळणारी रक्कम ते मुलांच्या लग्नासाठी वापरतील आणि घरही दुरुस्त करतील.

First published:

Tags: Madhya pradesh