नवी दिल्ली 21 जानेवारी : लग्नसोहळ्यातील विविध व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होण्यास आजकाल वेळ लागत नाही. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरता येत नाही. या व्हिडिओला सोशल मीडिया यूजर्ससुद्धा चांगला प्रतिसाद देताना दिसतात.
भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे आता सध्या सोशल मीडियावर लग्नसोहळ्यासंबंधी विविध व्हिडिओ दिसू लागले आहेत. खरतरं, लग्न म्हटलं की वधू-वर आणि मंत्र पठण करतानाचा गुरुजी, असं चित्र डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही. पण लग्नात एखादे गुरुजी मंत्रांसह इंग्रजी आणि हिंदीत डायलॉग म्हणताना दिसले तर? तुम्हाला ही कल्पना करूनच आश्चर्य वाटलं ना? पण एका लग्नात हे प्रत्यक्षात घडलं असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या नवरीबाईने मंडपात पोहोचण्यासाठी शोधला अनोखा जुगाड; काय केलं पाहा...VIDEO
पश्चिम बंगालमधील डमडम येथे नुकतंच एक लग्न पार पडलं असून, त्यातील एक व्हिडिओ वेगानं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ डमडम विमानतळाच्या जवळच झालेल्या एका लग्नसोहळ्याचा आहे. या लग्नात एक गुरुजी मंत्रांसोबतच हिंदी, इंग्रजी डायलॉग बोलून वधू-वरांचे लग्न लावताना दिसतायत.
वधू-वरही बोलत आहेत डायलॉग
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लग्न लावताना गुरुजी मंत्रांसोबत हिंदीमध्ये, ‘तेरा दिल मेरा दिल है, मेरा दिल तेरा दिल है, मेरी जिंदगी, तेरी जिंदगी, तेरी जिंदगी, मेरी जिंदगी,’ असे डायलॉग म्हणत आहे. व्हिडिओमध्ये हेच डायलॉग वधू-वर पुन्हा बोलताना दिसत असून, एकमेकांना एकत्र राहण्याचे वचन देत आहेत.
हे तर डिजिटल गुरुजी
गुरुजींचा हा पराक्रम पाहून विवाह सोहळ्यात उपस्थित नातेवाइकांनाही हसू आवरता आलेलं नाही. लग्नाचा हा भन्नाट सीन अनेकांनी कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटिझन्स यावर मजेदार कमेंटसुद्धा देत आहेत. अनेकांनी तर या गुरुजींना 2023 चे डिजिटल गुरुजी म्हटलं आहे. असीम बराल नावाच्या व्यक्तीनं ‘Wedding Wow’ नावाच्या सोशल मीडिया पेजवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे सोशल मीडियावरही या लग्नसराईची धूम दिसू लागली आहे. लग्नसोहळ्यातील फोटो, व्हिडिओ, रिल्स मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पाहण्यास मिळत आहे. या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्युज मिळत असून त्यावर कमेंटचा पाऊस पडताना दिसतोय. हे व्हिडिओ शेअर करण्याचे प्रमाणही वाढलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Wedding video