अहमदनगरमधील 70 वर्षांच्या आजीची धूम; कधी शाळेत गेली नाही मात्र Youtube वर पाडली छाप

अहमदनगरमधील 70 वर्षांच्या आजीची धूम; कधी शाळेत गेली नाही मात्र Youtube वर पाडली छाप

अहमदनगरपासून 15 किमी अंतरावर एका गावात राहणाऱ्या या आजीची रेसिपी तुम्हीही पाहिली असेल

  • Share this:

अहमदनगर, 31 ऑक्टोबर : आजकाल अनेक तरुण यूट्यूबवर (youtube) स्वत: चॅनल तयार करून पैसे आणि नाव कमवत आहेत. मात्र यामध्ये 70 वर्षांच्या आजीची वेगळीच कमाल पाहायला मिळत आहे.  ही आजी कधी शाळेत गेली नाही..मोबाइलच ही जेमतेम ज्ञान. मात्र या आजीने यूट्यूबवर मोठी छाप सोडली आहे. लोकप्रिय होण्यासाठी केवळ शिक्षण पूरेसं नसतं त्यासाठी जिद्द व मेहनत करण्याची तयारी असावी लागते.

ग्रामीण महाराष्ट्रात राहणारी ही 70 वर्षांची आजी आपल्या अनोख्या शैलीत विविध ग्रामीण पदार्थ तयार करण्यास शिकवते. विविध पदार्थांचे व्हिडीओ आजी आपल्या 'आजीच्या हातचं' या यूट्यूब चॅनलवरुन शेअर करते. चांगली बाब म्हणजे आजीला तिच्या कामाची पावती मिळाली आहे. आजीला यूट्यूबकडून सिल्वर बटन मिळालं आहे. आजीचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत. पारंपरिक पदार्थांसाठी लोक आवर्जुन आजीचे व्हिडीओ पाहतात.

यूट्यूबकडून मिळालेल्या सन्मानानंतर ते म्हणतात, मला आधी युट्यूब काय असतं हे माहित नव्हतं आणि यापूर्वी मी केव्हाच सोशल मीडियावर रेसिपी शेअर करण्याबद्दल विचार केला नव्हता. मात्र आता जर बरेच दिवस चॅनलवर कोणती रेसिपी शेअर केली नाही, तर मला अस्वस्थ होतं.

आजी सुमन धामने पारंपरिक पद्धतीने रेसिपी करायला शिकवते. त्याच्या विविध पदार्थांच्या चवीमुळे त्यांचे सबस्क्रायबर वाढत आहेत. आजीचं यूट्यूब चॅनल सुरू करण्याची कल्पना त्यांचा नातू यश पाठला आली.

सुरुवातील पाव भाजी तयार करतानाचा एक व्हिडीओ त्यांनी शेअऱ केला. येथूनच त्यांच्या लोकप्रियतेची सुरुवात झाली. आमचं आजीच्या जेवणावर खूप प्रेम आहे. यातूच तिचं यूट्यूब चॅनल सुरू करण्याची कल्पना आली व ते आम्ही पहिल्यांदा कारल्याच्या भाजीपासून केली. लोक तिच्या पदार्थांना खूप पसंत करत आहेत, असे यश सांगतो.

Published by: Meenal Gangurde
First published: October 31, 2020, 5:22 PM IST

ताज्या बातम्या