Home /News /viral /

देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रेंड! पण कारण महाराष्ट्रातील सत्तानाट्य नाही तर वेगळच!

देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रेंड! पण कारण महाराष्ट्रातील सत्तानाट्य नाही तर वेगळच!

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या सोशल मीडियावर फॉर्मात आले आहेत. मात्र, याला कारण राज्यातील सत्तानाट्य नाही तर दुसरेच आहे.

    मुंबई, 28 जून. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चेत आले आहे. मात्र, याला कारण राज्यातील सुरू असलेले सत्तानाट्य नाही. सध्या सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांचे काही जुने फोटो व्हायरल होत आहेत. फडणवीस यांच्या संघर्षाच्या दिवसांतील हे फोटो असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितलं आहे. व्हायरल झालेल्या फोटोत देवेंद्र फडणवीस खूपच आकर्षक दिसत आहेत. माजी मुख्यमंत्र्यांचे जुने फोटो व्हायरल नागपुरातील एका कपड्याच्या दुकानाच्या जाहिरातीच्या फोटोंना खूप प्रसिद्ध मिळाली आहे. प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांचे हे फोटो मॉडेलच्या स्वरूपात लावण्यात आले होते. हे जुने फोटो आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. यापूर्वी देखील हे फोटो प्रसिद्धीच्या झोतात आले होते. फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. तेव्हादेखील हे फोटो माध्यमांत झळकले होते. एका कपड्याच्या दुकानासाठी मॉडेलिंग नागपूर येथील एका कपड्याच्या दुकानाने फडणवीस यांचे हे फोटो असलेली पाच होर्डिंग्ज शहरात लावली होती. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस रंगीबेरंगी पोशाखात नागपूरच्या कपड्याच्या दुकानात पोज देताना दिसत आहेत. फोटोंनी सोशल मीडियावर लावली आग हा फोटो ट्विटरवर शेअर होताच व्हायरल झाला. हे फोटो भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मॉडेलिंग दिवसांचे फोटो आहेत. जे फोटोग्राफर विवेक रानडे यांनी त्यांच्या ग्राहकांना पोझ देण्यासाठी तयार केले होते. फडणवीस यांनी राजकारणात येण्याअगोदर मॉडेलिंग केल्याचं अनेकांना माहिती नाही. 2006 च्या सुमारास फडणवीस यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली रंगीबेरंगी पोशाखातील नागपुरी पोशाख ही नागपूरची ओळख आहे. फडणवीस यांची मॉडेलिंग फोटो त्यांच्या सध्याच्या गेट-अपच्या अगदी विरुद्ध आहेत, जे भारतात राजकारणी सहसा काय परिधान करतात याच्याशी सुसंगत आहेत. फडणवीस यांनी काही जाहिरातींसाठी शेफ म्हणूनही मॉडेलिंग केलं आहे. या फोटोंवर सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Devendra Fadnavis, Eknath Shinde

    पुढील बातम्या