नवी दिल्ली 28 सप्टेंबर : लग्नात (Marriage) अनेकदा आपण दीर आणि वहिनीची मस्ती आणि मस्करी बघत असतो. हे नातं इतर नात्यांपेक्षा अगदी वेगळं असतं. कारण यात प्रेम, रुसवा, भांडण, सन्मान आणि मस्ती असं सगळंच असतं. घरात वहिनीचा प्रवेश होणार असतो तेव्हा दीर फार उत्सुक असतो. इतकंच नाही तर भावजयीचं प्रत्येक म्हणणंही दीर ऐकतो. वहिनीनं जर दिराकडे काही काम सोपवलं तर तो ते कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करतोच. सध्या दीर आणि वहिनीचं हेच खास नातं दाखवणारा साखरपुड्यातील एक व्हिडिओ व्हायरल (Viral Engagement Video) होत आहे.
केसांचा रंग बदलताच पालटलं मॉडेलचं नशीब; रातोरात झाली लोकप्रिय, कमवते बक्कळ पैसे
सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Media) होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं, की वहिनी पंजाबी गाण्यावर जबरदस्त डान्स (Dance Video) करताना दिसत आहे. यादरम्यान वहिनीसोबत दिरांनेही ठुमके लगावले आहेत. व्हिडिओ पाहूनच तुम्हाला समजेल की या डान्स परफॉर्मन्ससाठी त्यांनी किती तयारी केली आहे. हे सर्व डान्स करत असताना तिथे उपस्थित असलेले इतर लोक त्यांच्यावर पैसे उधळत आहेत.
View this post on Instagram
वहिनीनं आपल्या साखरपुड्याचा व्हिडिओ पोस्ट करत याला अतिशय सुंदर कॅप्शन दिलं आहे. तिनं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, माझ्या दिरांसोबत माझा साखरपुड्यातील परफॉर्मन्स. हा डान्स शिकताना आणि करताना आम्ही खूप आनंद घेतला. ज्या लोकांनी पंजाबी समजत नाही त्यांना सांगते, की हे गाणं दीर आणि वहिनीवरच आहे. यात दीर वहिनीला म्हणतो, की मला लवकर लग्न करायचं आहे. मात्र, वहिनी त्याला सांगते, की लग्न करू नकोस, कारण लाडू दुसऱ्यांच्या हातातच चांगले वाटतात. डान्सदरम्यान पैसे उधळणं आणि मध्येच लोकांचं येऊन डान्स करणं इन्गोन करा, कारण हे सगळं पंजाबी लग्नांमध्ये होतंच, असंही तिनं म्हटलं आहे.
नवरीसाठी स्टेजरवरच केलं हे काम; नवरदेवानं जिंकली सगळ्यांची मनं, पाहा खास Video
सोशल मीडियावर हा व्हिडिओ नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. इन्स्टाग्रामवर साहिबा कौर नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ (Instagram Reels Video) शेअर केला गेला आहे. बातमी देईपर्यंत 8 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंटही केल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Wedding video