नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी : आजकाल लोक कशापासून काय बनवतील याचा कोणी विचारही करु शकत नाही. काही लोक आपल्या कौशल्याचा वापर करत हटके गोष्टी बनवण्याचं ट्राय करत असतात. आजपर्यंत अनेकांनी अनेक जुगाड केले असून याचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. यापैकी अनेक जुगाडूंना कौतुकाची थाप मिळाली तर काहींना अजब गोष्टींमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. अशातच आणखी एक जुगाड समोर आला असून याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
कोणतेही काम करणे तेही कमी पैशात आणि कमी संसाधनांमध्ये पूर्ण करणे अधिक महत्त्वाचे आहे. तसे पाहता, भारतीय हे या कलेमध्ये जगातील सर्वात निपुण आहेत. असाच एक जुगाडू व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने एका ऑटोला सुंदर डिझायनर कारमध्ये रूपांतरित केले आहे.
If Vijay Mallya had to design a low cost 3 wheeler taxi @NaikAvishkar pic.twitter.com/q3pTGEV6xL
— Harsh Goenka (@hvgoenka) February 4, 2023
हा व्हिडिओ सर्वप्रथम अविष्कार नाईक @NaikAvishkar या ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केला होता. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, नवीन रिक्षाचे डिझाइन. यानंतर प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयनका यांनी तो शेअर केला. गोयंका यांनी लिहिले की, जर विजय मल्ल्याला कमी खर्चात तीन चाकी टॅक्सी डिझाईन करायची असेल.
58 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये, एक ऑटोरिक्षा दिसत आहे. जी लक्झरी कारसारखी सुंदरपणे डिझाइन केली गेली आहे आणि मागील बाजूस अतिरिक्त सीट जोडली गेली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा हा ऑटो पूर्णपणे ओपन आहे. ऑटोरिक्षा दिसायला प्रीमियम आणि आलिशान दिसतेय. ऑटो पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाल्यातंही दिसून येत आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 34 हजार वेळा पाहिला गेला आहे, तर 425 लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. हा व्हिडीओ कुठचा आहे हे माहित नाही पण यूजर्सना तो खूप आवडला आहे आणि ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, भाऊने अप्रतिम ऑटो बनवला आहे. दुसर्याने लिहिले, चांगले आणि रॉयल दिसत आहे. अनेक गोष्टींना चांगला आकार देण्यात आपण भारतीय सर्वोत्कृष्ट आणि प्रशंसनीय आहोत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media viral, Video viral, Viral, Viral news