मराठी बातम्या /बातम्या /Viral /

भारीच! फक्त पँडल मारलं आणि चकाचक झाले कपडे; देशी Washing machine चा VIDEO

भारीच! फक्त पँडल मारलं आणि चकाचक झाले कपडे; देशी Washing machine चा VIDEO

देशी जुगाडने तयार केलेल्या या वॉशिंग मशीनमुळे कपड्यांचा मळ आणि शरीराचा फॅट दोन्ही गायब होईल.

देशी जुगाडने तयार केलेल्या या वॉशिंग मशीनमुळे कपड्यांचा मळ आणि शरीराचा फॅट दोन्ही गायब होईल.

देशी जुगाडने तयार केलेल्या या वॉशिंग मशीनमुळे कपड्यांचा मळ आणि शरीराचा फॅट दोन्ही गायब होईल.

  मुंबई, 07 ऑक्टोबर : कपडे धुणं (Washing cloth) तसं आता फार कष्टाचं काम राहिलं नाही. कारण यासाठी आता वॉशिंग मशीन (Washing machine) आल्या आहेत. पण वॉशिंग मशीन खरेदी करण्यासाठी तसे पैसेही मोजावे लागतात. शिवाय विजेचा खर्च आणि पाणी जास्त लागतंच. काही जणांना तर वॉशिंग मशीन घेणंही परवडण्यासारखं नाही. यावर काही शाळेतल्या मुलांनी एक जुगाड (Desi jugaad video) शोधून काढला आहे. स्वस्तात मस्त आणि विजेची गरज नाही अशी देशी वॉशिंग मशीन (Deshi washing machine video) या मुलांनी तयार केली आहे. सोशल मीडियावर देशी वॉशिंग मशीनचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. अगदी इलेक्ट्रिक वॉशिंग मशीनप्रमाणेच ही देशी वॉशिंग मशीन अगदी कमीत कमी वेळेत चकाचक कपडे धुते. फक्त एक ड्रम आणि सायकलच्या मदतीने ही मशीन तयार करण्यात आली. वीज नाही तर तुमच्या पायांनी ही मशीन चालते म्हणजे पँडल मारले की मशीनमध्ये टाकलेले कपडे स्वच्छ होऊन बाहेर येतात. हे वाचा - OMG! छोट्याशा खारीने भयंकर सापाला अक्षरशः कुरतडलं; कधीच पाहिला नसेल असा VIDEO व्हिडीओत पाहू शकता काही शालेय विद्यार्थी उभे आहेत. त्यापैकी एका विद्यार्थ्याच्या हातात एक पांढरं कापड आहे. हे कापड थोडं मळलेलं, अस्वच्छ आहे. या मुलाच्या समोर एक आडवं ड्रम आहे आणि त्याला सायकल जोडलेली आहे. ड्रमाच्या आत एक व्हिलसारखं काहीतरी लावण्यात आलं आहे. या ड्रमात पाणी आणि डिटर्जेंट टाकण्यात आलं आहे. मुलगा त्यामध्ये तो कपडा टाकतो. त्यानंतर सायकलवर बसून पँडल मारतो. अवघ्या काही मिनिटांतच तो सायकलवरून उतरतो आणि ड्रममध्ये टाकलेलं कापड काढतो. अरेच्चा हे काय, मळलेलं कापड एकदम पांढरंशुभ्र झालं आहे. पाहूनही डोळ्यांर विश्वास बसत नाही.
  मीडिया रिपोर्टनुसार हे देशी वॉशिंग मशीन मुलांनी आपल्या एका शाळेच्या प्रोजेक्टअंतर्गत तयार केलं आहे. पण खऱ्या आयुष्यात या मशीनचा वापर खरंच खूप फायदेशीर ठरू शकतो. जे लोक फिटनेस फ्रिक आहेत. म्हणजे नियमित व्यायाम करतात. त्यांच्यासाठी हे मशीन डबल फायदेशीर आहे. म्हणजे या सायकलवर बसून पँडल मारून एक्सरसाईझही होईल आणि सोबतच कपडेही धुवून निघतील. कपड्यांचा मळ आणि तुमच्या शरीराचा फॅट दोन्ही गायब होईल. हे वाचा - वेगात चाललात किंवा धावलात तरीही या कपातून चहा-कॉफी सांडणार नाही, पाहा VIDEO Stories 4 Memes इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ही देशी वॉशिंग मशीन सर्वांना आवडली आहे. शरीर आणि खिसा दोघांना परवडणारी अशी ही मशीन आहे, अशी प्रतिक्रिया एका युझरने दिली आहे तर हा जुगाड पाहून भलेभले शास्त्रज्ञही हैराण होतील, अशी कमेंट एका युझरने केली आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Lifestyle, Viral, Viral videos

  पुढील बातम्या