मुंबई 30 नोव्हेंबर : भारतात जुगाडू लोकांची काहीही कमी नाही. ते कधी काय करतीय याचा काही नेम नाही. एखादी वस्तु नवीन घेण्यापेक्षा आहे त्याच वस्तुपासून उपयोगी वस्तु बनवण्याची जी कला भारतीयांकडे आहे, अशी कला जगात कोणाकडे नाही आणि या वाक्यावर तुम्ही देखील समहत कराल.
बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला, तसेच सोशल मीडियावर देखील आपल्याला देसी जुगाड संदर्भात अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ असे असतात, जे पाहून तुम्ही डोक्याला हात लावाल.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून तुम्ही खरंच म्हणाल, ''लोक काहीही करु शकतात....''
हे ही पाहा : Gas Cylinder वर कोड का लिहिला जातो? हे आताच माहित करुन घ्या नाहीतर होईल पश्चाताप
या व्हायरल व्हिडीओमध्ये एक इस्त्रीवाला कपड्यांना इस्त्री करत आहे. पण ही व्यक्ती ज्यापद्धतीने इस्त्री करत आहे, तो खरंतर चर्चेचा विषय आहे.
खरंतर ही व्यक्ती गॅस सिलेंडरचा वापर करुन इस्त्री करत आहेत. जे पाहाताना फारच विचित्र वाटत आहे. तुम्ही लोकांना इलेक्ट्रिकच्या इस्त्रीने किंवा कोळशाच्या इस्त्रीने कपडे इस्त्री करताना पाहिले असेल, पण ही व्यक्ती थेट सिलेंडरचा वापर करुन कपड्यांना इस्त्री करत आहे.
View this post on Instagram
हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप आवडला आहे. मात्र, हा व्हिडीओ थोडा जुना आहे, पण तरीही लोकांना हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे.
व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला अचानक त्याच्या परिसरात इस्त्रीवाला माणूस दिसला की तो घरात वापरल्या जाणाऱ्या सीएनजी गॅसद्वारे कापडे इस्त्री करत बसला होता, त्याने कापडे प्रेस करणाऱ्या व्यक्तीला विचारले की सीएनजी गॅसद्वारे कापडाला इस्त्री कशी करतोस आणि तु हे किती दिवसापासून करत आहेस? तेव्हा त्या व्यक्तीने उत्तर दिले की तो हे चार वर्षांपासून करतोय.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या व्यक्तीने सीएनजी गॅसमध्ये पाईप टाकून तो इस्त्रीला जोडला आहे आणि या इस्त्रीमध्ये आग लावून तो इस्त्री करतोय.
हा व्हिडीओ विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'व्वा, काय टॅलेंट आहे.'
हे सगळं पाहाताना कितीही मनोरंजक वाटत असलं, तरी देखील हा जुगाड फारच धोकादायक आहे. त्यामुळे लोकांनी या सगळ्यापासून लांबच राहावे आणि या जुगाडाच्या प्रेमात पडू नये. त्याला अंमलात आणण्याचा विचार तर अजिबातच करु नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Top trending, Videos viral, Viral