मुंबई 23 जानेवारी : सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे. जिथे नेहमीच असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे आपलं मनोरंजन करतात. हे व्हिडीओ इतके मस्त असतात की ते पाहताना आपल्याला वेळेचं भानच राहात नाही. म्हणूनच तर याचं व्यसन लागलं असं आपण अनेकदा म्हणतो. ते काहीही असलं तरी देखील खरोखर इथे असे काही भन्नाट व्हिडीओ पाहायला मिळतात, जे कौतुकास्पद असतात.
सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती ना रस्सी ना शिडी, ना कोणत्याही मशिनच्या सह्याने तो खांब्यावर चढत आहे.
हे ही पाहा : डोंगराळ भागात अचानक हवेत उडू लागली बस, Video पाहून तुम्हीही चक्रावाल
आता तुमच्या मनात नक्कीच असा प्रश्न उभा राहिला असेल की हे कसं शक्य आहे. तर जास्त विचार करु नका हा व्हिडीओ पाहा तुम्हाला सगळं काही लक्षात येईल.
Desi tools used by electricians to climb poles.... Jugaad at its best pic.twitter.com/l0uls50oFK
— Hasna Zaroori Hai (@HasnaZarooriHai) November 24, 2022
खरंतर ही व्यक्ती इलेक्ट्रिशन आहे. या व्यक्तीचं रोजचं काम आहे की विजेच्या खांब्यावर चढून तारा दुरुस्त करणे. यासाठी तो आपल्या सायकलवरुन गावभर फिरतो. पण यासाठी तो सोबत शिडी घेऊन फिरु शकत नाही, मग काय करणार तर त्याने एक भन्नाट जुगाड शोधून काढला, यासाठी त्याने एक वेगळीच चप्पल तयार केली आहे, ज्याला लोखंडी सळ्या अशापद्धतीने लावल्या आहेत की त्या खांबांमध्ये सहज अडकेल आणि त्याला आरामात वर चढता येईल.
हा व्हिडीओ @HasnaZarooriHai या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला 10 हजाराहून अधिक लाईक आणि शेअर केलं गेलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Social media, Social media trends, Top trending, Videos viral, Viral