मराठी बातम्या /बातम्या /Viral /याला म्हणतात शुद्ध देसी जुगाड! क्षणात VIRAL झाली ही डिस्को सायकल

याला म्हणतात शुद्ध देसी जुगाड! क्षणात VIRAL झाली ही डिस्को सायकल

सायकल ही सायकल असते, त्यात काय एवढं असं नका म्हणू. हा फोटो पाहा.

सायकल ही सायकल असते, त्यात काय एवढं असं नका म्हणू. हा फोटो पाहा.

सायकल ही सायकल असते, त्यात काय एवढं असं नका म्हणू. हा फोटो पाहा.

मुंबई, 13 मार्च : सोशल मीडियावर (social media video viral) सतत काहीतरी मजेदार व्हायरल होत असतं. फोटो आणि व्हिडिओ काही मिनिटात व्हायरल होतात. व्हायरल फोटोज युजर्सना खूप आवडतात. अनेकदा हे फोटो असे असतात, की पाहून आपण थक्क होतो, कधी हसत सुटतो. आता असाच एक फोटो समोर आला आहे. तो पाहू कुणीही चकीत होईल. हा फोटो आहे एका सायकलचा. (viral photo of desi cycle)

ही सायकल काही साधीसुधी नाही. या सायकलला खास भारतीय जुगाड करून बनवलं आहे. ही आहे डिस्को सायकल. या सकाळचा फोटो IFS परवीन कासवान यांनी शेअर केला आहे. फोटोसह त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे, की या सायकलींना डिस्को सायकल्स म्हणतात. (desi cycle photo on social media)

या सामान्य सायकल्सहून वेगळ्या आहेत. या सायकलींवर विविध प्रकारचं जड सामान वाहून नेलं जातं. या सायकलच्या मदतीनं जंगलात त्या जागांवर सामान नेता येतं जिथं वाहन जाऊ शकत नाही. (ifs officer shares photo of disco cycle)

माहितीसाठी सांगायचं तर, या ट्विटला आतापर्यंत 1 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 62 लोकांनी याला रिट्विट केलं आहे. अनेकजण या सायकलच्या फोटोवर आपापलं मत देत आहेत. अनेकांनी याला जबरदस्त जुगाड म्हटलं आहे.

अनेकांनी या फोटोबाबत मजेदार प्रश्नही विचारले आहेत.

एकजण म्हणतो आहे, याला तर बसण्यासाठी सीटच नाही.

दुसरा सांगतो, 'हे थोडं odd वाटत आहे.' अजून एकजण म्हणतो आहे, 'याला तर पॅडल्सच नाहीत.'

First published:
top videos

    Tags: Photo, Twitter, Viral photo