मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike

VIDEO : कमरेवर पदर खोचून धरला नेम; साडीवरच आजीचा परफेक्ट Bowling strike

साडी नेसून आजीबाईंनी एकाच फटक्यात परफेक्ट बॉलिंग स्ट्राइक केला आहे.

साडी नेसून आजीबाईंनी एकाच फटक्यात परफेक्ट बॉलिंग स्ट्राइक केला आहे.

साडी नेसून आजीबाईंनी एकाच फटक्यात परफेक्ट बॉलिंग स्ट्राइक केला आहे.

    मुंबई, 18 मे :  खेळ कोणताही असूदे त्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे हवेत असंच अनेकांचं असतं. साडी आणि खेळ यांचा तर दूरदूरचाही संबंध नाही. साडीवर अनेक महिलांना साधं चालणंही जमत नाही. मग त्यावर खेळणं तर कुणाच्या कल्पनेतही नसतो. पण याच साडीवर एका आजीबाईंनी मात्र असा परफेक्ट बोलिंग स्ट्राइक (grandmother bowling strike in saree) केला आहे की पाहून तुम्हीही हैराण व्हाल.

    अनेकांना पँट, शॉर्ट किंवा आरामदायी कपड्यातही जे जमलं नाही ते आजीने साडी नेसून केलं आहे. एकाच फटक्यात त्यांनी परफेक्ट बॉलिंग स्ट्राइक केला आहे. साडी नेसून बोलिंगचा गेम खेळणाऱ्या आजींचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

    अवघ्या पंधरा सेकंदाच्या या व्हिडिओत पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या एक आजीबाई मास्क, स्निकर शूज घालून चक्क बोलिंगचा गेम (Bowling Game) खेळताना दिसत आहेत. पहिल्याच फटक्यात त्यांचा नेम अचूक लागल्यानं सर्व बोलिंग पिन्स (Bowling Pins) पडल्या त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंदानं हसू फुललं आहे. यात काय विशेष आहे, असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे.  बॉल टाकून झाल्यावर आधी त्या आपला मास्क नीट नाकावर आहे नां, हे बघत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. या आजीबाई बोलिंग क्वीन (Bowling Queen) म्हणून सोशल मीडियावर एकदम लोकप्रिय झाल्या आहेत.

    हे वाचा - ...म्हणून त्याने गाणं गाऊन आईला अलविदा केलं; कारण ऐकून आवरणार नाही अश्रू

    सुदर्शन कृष्णमूर्ती या त्यांच्या नातवानं ट्विटरवर (Twitter) हा व्हिडिओ शेअर केला आहे. या आजीबाईंवर नेटीझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. आधुनिक खेळातही अजिबात मागे न राहता त्याला आपलंसं करणाऱ्या या कूल आजीबाई सगळ्यांचं मन जिंकून गेल्या आहेत. एका नेटीझननी हा व्हिडिओ बघून आपला दिवस प्रसन्न झाल्याची भावना व्यक्त केली आहे. कुल कूल ! अमेझिंग ! अशा प्रतिक्रियाही नेटीझन्सनी व्यक्त केल्या आहेत.

    हे वाचा - Olympic Champion चा ब्रेस्टफीडिंग करत शीर्षासन करणारा फोटो VIRAL

    एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये पुण्यातील (Pune) लाठीचा खेळ (Martial Arts) करणाऱ्या 85 वर्षांच्या शांता बाळू पवार यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. वॉरियर आजी (Warrior Grandmaa) म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यांच्या खेळानं या वयातही कष्ट करून पैसे कमावण्याच्या स्वाभिमानी वृत्तीनं अभिनेता सोनू सूद यालाही प्रभावित केलं होतं. त्यानं त्यांच्या शस्रकलेचं प्रशिक्षण देण्यासाठी शाळा बांधण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.

    First published:

    Tags: Game, Viral, Viral videos