Desi bride bindass dance with best friend: कोणतंही लग्न संगीत, गाणी याशिवाय अपूर्ण आहे. जोपर्यंत काही पंजाबी गाणी वाजत नाही, तोपर्यंत लग्नाच नाचताना मजा येत नाही. काही गाणी तर लग्न असो वा पब सर्वत्र ऐकायला मिळतात. सुखबीरचं गाणंही असंच काहीसं आहे. हे गाणं (Marriage) लागल्यानंतर स्टेजवर उभी असलेली नवरीदेखील स्वत:ला रोखू शकली नाही. आणि नवरदेव भावाशी बोलत असताना आनंदात नाचली. समोरून कोणीतरी हा व्हिडीओ शूट (Viral Video) केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ एका लग्न मंडपातील आहे. येथे एकमेकांना हार घातल्यानंतर नवरदेव आणि नवरी मंचावर उपस्थित आहेत. याच वेळी अचानक 'इश्क तेरा तडपावे' हे गाणं वाजतं आणि नवरी स्टेजवरच नाचू लागले. एक मुलगा तिच्यासमोर येऊ नाचू लागतो. यानंतर दोघेही सुखबीरच्या गाण्यावर अशा पद्धतीने डान्स करतात की, नवरदेवाचा भाऊही दोघांकडे बघतच राहतो. डान्स करताना त्यांचा उत्साह आणि स्टेप्स हे सगळेच नंबर वन आहेत. कदाचित यामुळेच हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम हँडल thenehatales ने शेअर केला होता. या व्हिडीओला आतापर्यत 7.4 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. शेकडो लोक हा व्हिडीओ पाहिल्यानंकर प्रतिक्रियाही देत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.