Home /News /viral /

कायच्या काय! तुम्ही फेकून देता ती करवंटी ऑनलाइन मिळतेय 2000 रुपयांना

कायच्या काय! तुम्ही फेकून देता ती करवंटी ऑनलाइन मिळतेय 2000 रुपयांना

देवासमोर फोडण्यासाठी, खाद्यपदार्थ बनवण्यासाठी नारळाचा (coconut) वापर केला जातो. नारळ आणल्यानंतर करवंट्या कचऱ्यात फेकून दिल्या जातात; पण पुढच्या वेळी नारळाची करवंटी (coconut shells) कचऱ्यामध्ये टाकून देण्याआधी विचार करा.

मुंबई, 12 फेब्रुवारी: देवासमोर फोडण्यासाठी, खाद्यपदार्थ बनवण्यासाठी नारळाचा (coconut) वापर केला जातो. नारळ आणल्यानंतर करवंट्या कचऱ्यात फेकून दिल्या जातात; पण पुढच्या वेळी नारळाची करवंटी (coconut shells) कचऱ्यामध्ये टाकून देण्याआधी विचार करा. याचं कारण म्हणजे याच नारळाच्या करवंट्यांना खूप मागणी (demand of coconut shells) आहे. आपण वापरून फेकून देतो, त्या करवंट्या ऑनलाइन विकल्या जात आहेत आणि तेही प्रचंड महाग. वस्तूंची विक्री करणाऱ्या अनेक वेबसाइट्स करवंट्या विकत आहेत. या करवंट्यांची मागणी इतकी का वाढली आहे आणि त्यांचा वापर कशासाठी केला जातोय, ते जाणून घेऊ या. ऑनलाइन साइट्सवर नारळाच्या करवंट्या उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहे. या करवंट्यांचा खपही मोठ्या प्रमाणावर होत आहे. भारतातही विविध साइट्सवर या करवंट्या ऑनलाइन खरेदीसाठी उपबल्ध आहेत. एका वेबसाइटवरील माहितीनुसार, विदेशातल्या एका वेबसाइटवर तर एक करवंटी 21 डॉलर्सना विकली जातेय. त्यावर 10 डॉलरपर्यंतचे शिपिंग चार्जेसदेखील (shipping charges) आकारले जात आहेत. म्हणजे एक करवंटी तब्बल 31 डॉलर्समध्ये मिळते. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास नारळाच्या एका करवंटीसाठी ग्राहक 2 हजार रुपये खर्च करत आहेत. हे वाचा-देसी जुगाड, तरुणांनी मातीपासून बनवली Bugatti कार; रस्त्यावर येताच लोकं म्हणतात.. आता नारळाची एक करवंटी इतकी महाग विकली जातेय, तर त्यामागचं कारण काय, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. करवंट्यांचा वापर वाटी म्हणून केला जात आहे. बरेच जण त्यांचा ट्रे म्हणून वापर करत आहेत. याशिवाय आणखी बऱ्याच दैनंदिन वापरातल्या वस्तू त्यापासून बनवल्या जात आहेत. कारण या वस्तूंना बाजारात खूप मागणी आहे. याशिवाय या करवंट्यांचा वापर सजावटीसाठीही होत आहे. या करवंट्यांवर रंगीबेरंगी, वेगवेगळी डिझाइन्स केली जात आहेत. त्यांचा वापर घराची सजावट करण्यासाठी होतो. शिवाय अनेक जण त्याचा वापर रोपं लावण्यासाठी कुंडीप्रमाणेदेखील करत आहेत. परदेशामध्ये नारळाच्या करवंट्या पॉलिश करून कप म्हणून वापरण्याचा ट्रेंडही अलीकडे पाहायला मिळतोय. त्यामुळे हौशी मंडळी एका कपसाठी हजार-बाराशे रुपये देण्यास आनंदाने तयार आहेत. हे वाचा-बापरे! हे काय? तुम्हीही आवडीने बर्फाचा गोळा खात असाल तर हा VIDEO पाहायलाच हवा आपण आजपर्यंत वापरून कचऱ्यात टाकायचो ती करवंटी विदेशात इतकी महाग विकली जात आहे. यापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू नैसर्गिक असतात. त्यासाठी कोणतंही केमिकल (chemical) किंवा इतर वस्तूंचा वापर होत नाही. त्यामुळे सध्या याचा ट्रेंड बघायला मिळत आहे.
First published:

Tags: Photo viral

पुढील बातम्या