मराठी बातम्या /बातम्या /Viral /

500 मीटर गाडीच्या बोनेटवर लटकत होता ट्रॅफिक पोलीस, चालकानं मारला ब्रेक आणि..., थरारक CCTV VIDEO

500 मीटर गाडीच्या बोनेटवर लटकत होता ट्रॅफिक पोलीस, चालकानं मारला ब्रेक आणि..., थरारक CCTV VIDEO

कार चालवणाऱ्या युवकाने पोलीस हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न केला. स्वत: चा बचाव करत पोलीस हवालदारानं गाडीच्या बोनेटवर उडी मारली.

कार चालवणाऱ्या युवकाने पोलीस हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न केला. स्वत: चा बचाव करत पोलीस हवालदारानं गाडीच्या बोनेटवर उडी मारली.

कार चालवणाऱ्या युवकाने पोलीस हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न केला. स्वत: चा बचाव करत पोलीस हवालदारानं गाडीच्या बोनेटवर उडी मारली.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर : वाहतूक पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र नवी दिल्लीत एक भयंकर प्रकार पाहायला मिळाला. दिल्लीतील कॅंट भागात कार चालवणाऱ्या युवकाने पोलीस हवालदाराला चिरडण्याचा प्रयत्न केला. स्वत: चा बचाव करत पोलीस हवालदारानं गाडीच्या बोनेटवर उडी मारली. मात्र तरी, आरोपींने गाडी थांबवली नाही. कर्मचारी 500 मीटर गाडीच्या बोनेटवरच होता. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

एवढेच नाही तर पोलीस अधिकाऱ्याला पाडण्यासाठी या युवकानं गाडी वाकडी तिकडी चालवण्यास सुरुवात केली, आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकांनी या युवकताला पकडले. दिल्लीतील या गाडीची फॅन्सी नंबर प्लेट पाहिल्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने चालकास गाडी थांबविण्याचे सांगितले, मात्र या चालकानं पोलीस अधिकाऱ्यालाच चिरडण्याचा प्रयत्न केला.

वाचा-लई भारी!! डोळ्यावर पट्टी बांधून 49 नारळ फोडून केला World Record; थरारक VIDEO

वाचा-छेड काढणाऱ्याला महिलेनं शिकवली चांगलीच अद्दल; झाडाला बांधलं आणि... VIDEO VIRAL

या वाहतूक पोलीस अधिकाऱ्याचे नाव महिपाल सिंग असून ते दिल्ली कॅन्ट ट्रॅफिक सर्कलमध्ये तैनात आहे. सोमवारी त्यांची ड्युटी धौलाकुआन येथे होती. सायंकाळी पाच वाजता टिळक नगरकडे जाणाऱ्या एका फॅन्सी नंबर प्लेट आय 20 कारला पाहून त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. उत्तम नगर येथील शुभम या 22 वर्षीय कार चालवत होता.

वाचा-भयंकर! वृद्ध व्यक्तीला 20 तास फ्रिजरमध्ये ठेवलं; बाहेर काढलं तेव्हा होते जिवंत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमसमवेत त्याचा मित्र राहुल गाडीत होता. शुभमने सांगितले की, पोलीस अधिकाऱ्याला गाडीच्या बोनेटवर पाहून त्याला भीती वाटली, म्हणून त्यानं गाडी थांबवली नाही. शुभमने सुमारे 500 मीटर कार चालविली आणि बोननेटवर असलेल्या महिपाल सिंग यांना पाडून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र लोकांनी त्याला धरले. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

First published:

Tags: Video viral