विमान सोडा आता बसमधून करा थेट लंडनपर्यंतचा प्रवास! येणार इतका खर्च

विमान सोडा आता बसमधून करा थेट लंडनपर्यंतचा प्रवास! येणार इतका खर्च

फक्त लंडनच नाही तर या 18 देशांमध्येही मिळणार फिरण्याची संधी, प्रवासाठी मोजावे लागणार इतके पैसे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. दिल्लीहून लंडन गाठण्यासाठी सामान्यत: लोकं विमानातून प्रवास करतात. मात्र आता बसमधून दिल्ली ते लंडन प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. गुडगावच्या एका खासगी प्रवासी कंपनीने 15 ऑगस्ट रोजी 'बस टू लंडन' नावाची बस सुरू केली. या बसद्वारे तुम्ही 70 दिवसांत दिल्लीहून लंडनला पोहचू शकता.

दिल्ली ते लंडन या 70 दिवसांच्या प्रवासात तुम्हाला इतर 18 देशांतून जावे लागणार आहे. यात भारत, म्यानमार, थायलंड, लाओस, चीन, किर्गिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, रशिया, लाटविया, लिथुआनिया, पोलंड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स आणि युनायटेड किंग्डम यांचा समावेश आहे. हे कसे शक्य होईल असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल.

वाचा-…आणि कुत्र्याच्या पट्ट्यावर पाय देताच झाला महिलेचा मृत्यू! पाहा CCTV VIDEO

मिळणार या सुविधा

दिल्लीत राहणारे तुषार आणि संजय मदन हे दोघे पूर्वी दिल्लीहून लंडनला रस्त्याने गेले आहेत. एवढेच नव्हे तर या दोघांनीही 2017, 2018 आणि 2019 मध्ये कारने प्रवास केला होता. त्याच धर्तीवर, यावेळी 20 लोकांसह, त्यांनी बसने लंडन गाठण्याचा निश्चय केला आहे. 'बस टू लंडन' च्या या प्रवासात तुम्हाला प्रत्येक सुविधा देण्यात येईल. या प्रवासासाठी विशेष बस तयार केली जात आहे. या बसमध्ये 20 प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था असेल. सर्व सिट बिझनेस क्लाससाठी असतील. 20 प्रवाशांच्या बसण्याच्या जागेसह 4 आणखी सिट असतील. बसमध्ये चालक, सहाय्यक ड्रायव्हर, आयोजकातील एक व्यक्ती आणि मार्गदर्शक यासह 4 इतर लोक असतील. 18 देशांच्या या प्रवासात मार्गदर्शक बदलतच राहतील, जेणेकरून प्रवाशांना अडचण येऊ नये.

वाचा-एका सेकंदानं हुकला मृत्यू! स्पीडमध्ये अगदी जवळून गेली महिंद्रा व्हॅन अन् तो...

येणार इतका खर्च

दिल्ली ते लंडन प्रवास करण्यासाठी तुम्हाला 15 लाखांचा खर्च येणार आहेयया टूरसाठी तुम्हाला ईएमआयचा पर्यायही देण्यात येईल. अॅरडव्हेंचर ओव्हरलँड ट्रॅव्हलर कंपनीचे संस्थापक तुषार अग्रवाल यांनी सांगितले की, "मी आणि माझे साथीदार संजय मदन आम्ही गाडीने दिल्ली-लंडन असा 2017, 2018 आणि 2019 मध्ये प्रवास केला होता, तर आमच्याकडे आम्ही दरवर्षी अशा सहलीचे आयोजन करतो". ही ट्रिप 15 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली आहे. तरी, मे 2021 पासून प्रवासाला सुरुवात होऊ शकते. सध्या कोरोनामुळे प्रवाशांची नोंदणी सुरू झालेली नाही. हा प्रवास भारत तसेच इतर देशांच्या परिस्थिती लक्षात घेऊन सुरू करण्यात येईल.

Published by: Priyanka Gawde
First published: August 24, 2020, 2:34 PM IST
Tags: travelling

ताज्या बातम्या