मराठी बातम्या /बातम्या /Viral /

काय सांगता, दिल्लीवरून लंडन दोन तासांत?; 2030 पर्यंत संकल्पना येऊ शकते प्रत्यक्षात

काय सांगता, दिल्लीवरून लंडन दोन तासांत?; 2030 पर्यंत संकल्पना येऊ शकते प्रत्यक्षात

(फोटो: Oscar Viñals/SWNS via Daily Star)

(फोटो: Oscar Viñals/SWNS via Daily Star)

येत्या काळात असं विमान तयार जाऊ शकतं जे लंडन ते न्यूयॉर्क सिटीदरम्यानचं सुमारे पाच हजार किलोमीटर्सचं अंतर केवळ 80 मिनिटांत पार करू शकतं.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • | London

तुम्ही अनेक अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट पाहिले असतील, ज्यात नायक प्रचंड वेगाने धावताना किंवा उडताना दिसतो. या काल्पनिक कथा आणि पात्रं असली तरी शास्त्रज्ञ दीर्घ काळापासून यावर विचार करत आहेत. प्रकाश किंवा ध्वनीच्या वेगाने धावणारी वाहनं बनवण्यात त्यांना यश आलं तर मानवी जीवनात मोठा बदल घडून येईल. आता कदाचित शास्त्रज्ञ या अनोख्या शोधाच्या जवळपास पोहोचले आहेत, असं म्हणायला हरकत नाही.

`डेली स्टार`या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, येत्या काळात असं विमान तयार जाऊ शकतं जे लंडन ते न्यूयॉर्क सिटीदरम्यानचं सुमारे पाच हजार किलोमीटर्सचं अंतर केवळ 80 मिनिटांत पार करू शकतं, असा दावा स्पॅनिश डिझायनर ऑस्कर विनाल्स यांनी केला आहे. यावरून हिशेब लावायचा म्हटलं, तर दिल्ली ते लंडन हे 6700 किलोमीटर्स अंतर सुमारे 120 मिनिटं अर्थात दोन तासांत पार होऊ शकतं. विनाल्स म्हणाले, `येत्या काळात सुमारे 170 प्रवासी या विमानाचा आनंद घेऊ शकतात, ज्याचा वेग ध्वनीच्या तीन पट असेल.`

कोल्ड फ्युजन न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरवर उडणार विमान -

या विमान बनवण्याच्या संकल्पनेला `हायपर स्टिंग फ्लाइट` असं नाव देण्यात आलं आहे. विनाल्स म्हणाले, `कोल्ड फ्युजन न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरच्या मदतीने हे विमान आकाशात उड्डाण करील. तसंच या माध्यमातून दोन रॅमजेट इंजिन आणि चार नेक्स्ट जेन हायब्रिड टर्बोजेटला पॉवर मिळेल. हायपर स्टिंग विमानाची लांबी सुमारे 328 फूट असेल आणि एका पंखापासून दुसऱ्या पंखापर्यंतची रुंदी 169 फूट असेल.`

2030 पर्यंत विमानाचं काम पूर्ण होणार -

विनाल्स म्हणाले, `सुपरसॉनिक विमानांचं नवं युग येणार आहे. परंतु, त्याच्यासमोर अशी अनेक आव्हानं आहेत ज्यात सुधारणा करावी लागेल. कारण ध्वनीच्या वेगानं उडणं वाटतं तितकं सोपं नाही. हायपर स्टिंग ही भविष्यातल्या सुपरसॉनिक व्यावसायिक विमानांसाठी एक नवीन संकल्पना आहे. आजच्या काळात या विमानांच्या बांधणीचं काम प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक खासगी आणि सार्वजनिक उपक्रम हाती घेतले जात आहेत,` असं विनाल्स यांनी नमूद केलं.

बार्सिलोनामधल्या एका पत्रकारानं सांगितलं, `त्यांची संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकते; मात्र त्यासाठी काही तांत्रिक सुधारणा करण्याची गरज आहे. या प्रकारची विमानं 4000 किलोमीटर्स प्रति तास या वेगाने उडू शकतील आणि 2030 पर्यंत अशी विमानं तयार होऊ शकतात.` ऑस्कर विनाल्स यांच्या संकल्पनेतल्या विमानाची उडण्याची उंची सुमारे 65 फूट असेल.

First published:

Tags: Airplane, Airport, Travel by flight