थंडीपासून वाचण्यासाठी रिक्षावाल्याचा अजब जुगाड! VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

थंडीपासून वाचण्यासाठी रिक्षावाल्याचा अजब जुगाड! VIDEO पाहून लावाल डोक्याला हात

याला म्हणतात आयडियाची कल्पना, ग्राहकांना थंडीपासून वाचवण्यासाठी रिक्षावाल्यानं लढवली शक्कल.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : देशाची राजधानी दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी पसरली आहे. दिल्लीत अनेक भागात धुक्याची चादर पसरली असल्यामुळे दिल्लीकरांना सध्या परदेशी असल्याचा भास होत आहे. दिल्लीच्या या थंडीमुळे लोकांना आपला जीवही गमवावा लागला. त्यामुळं सर्व सामन्य लोक थंडीपासून वाचण्यासाठी वेगवेगळा युक्त्या काढत आहेत.

दिल्लीतील थंडी दिवसेंदिवस वाढत आहे आणि शीतलहरीमुळे लोकांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. थंडीमुळे लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. यातच एका रिक्षाचालकानं एक अजब जुगाड केला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या म्हणण्यानुसार सोशल मीडियावरील सध्या या रिक्षाचालकाचा फोटो व्हायरल होत आहे. या रिक्षाचालकानं थंडीपासून वाचण्यासाठी आपल्या ऑटोमध्ये प्लास्टिकच्या बबल रॅपचा वापर केला आहे.

वाचा-चेकपाॉईंटवर थांबवलेली बाईक आवडली ना राव! पोलिसांनी या BMWसोबत काय केलं पाहा

वाचा-बाबो काय हे! चहामध्ये बुडवून खाल्ली इडली, VIDEO VIRAL

या ऑटोचे GIF एका युझरने ट्विटरवर शेअर केला आहे. यात रिक्षाला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवले होते. हा GIF अपलोड करणाऱ्याने “रिक्षाचालकाने माझे मन जिंकले. हे एक साधे तंत्र आहे परंतु दिल्लीच्या हिवाळ्यात प्रवाश्यांना वाचविणे हे खूप प्रभावी आहे“, असे लिहिले.

वाचा-स्कॉर्पिओमध्ये टाकून ATM मशीन केलं लंपास, चोरट्यांच्या चोरीचा VIDEO VIRAL

दोन दशकातील सर्वात निच्चांकी तापमान

डिसेंबर महिन्यातील दोन दशकातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. याआधी 1997 साली पहिल्यांदा दिल्लीकरांनी एवढ्या थंडीचा अनुभव घेतला होता. दिल्लीत सलग 13 दिवस अशी कडाक्याची थंडी पडली होती. डिसेंबर महिन्यातील कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी 1919, 1929, 1961 आणि 1997 मध्ये दिल्लीकरांनी अनुभवले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी कमाल तापमान 19.85 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले होते. गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी पसरली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: December 31, 2019, 2:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading