मराठी बातम्या /बातम्या /Viral /

कुत्र्याने लायसन्स खाल्लं, गर्लफ्रेंड वाट बघतेय; ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यावर लोकं काय कारणं देतात? वाचा

कुत्र्याने लायसन्स खाल्लं, गर्लफ्रेंड वाट बघतेय; ट्रॅफिक पोलिसांनी पकडल्यावर लोकं काय कारणं देतात? वाचा

दिल्ली पोलिसांचं (Delhi Police) एक ट्वीट आणि त्यावर नेटिझन्सनी (Netizens) दिलेल्या प्रतिक्रिया सध्या खूप चर्चेत आहेत. कारवाई टाळण्यासाठी कोणती मजेशीर आणि अजब कारणं वाहनचालक देऊ शकतात, याचा अंदाज या प्रतिक्रियांवरून येतो.

दिल्ली पोलिसांचं (Delhi Police) एक ट्वीट आणि त्यावर नेटिझन्सनी (Netizens) दिलेल्या प्रतिक्रिया सध्या खूप चर्चेत आहेत. कारवाई टाळण्यासाठी कोणती मजेशीर आणि अजब कारणं वाहनचालक देऊ शकतात, याचा अंदाज या प्रतिक्रियांवरून येतो.

दिल्ली पोलिसांचं (Delhi Police) एक ट्वीट आणि त्यावर नेटिझन्सनी (Netizens) दिलेल्या प्रतिक्रिया सध्या खूप चर्चेत आहेत. कारवाई टाळण्यासाठी कोणती मजेशीर आणि अजब कारणं वाहनचालक देऊ शकतात, याचा अंदाज या प्रतिक्रियांवरून येतो.

मुंबई, 9 जुलै : आपण रोज विविध कारणांसाठी प्रवास करत असतो. या प्रवासासाठी टू-व्हीलर किंवा कारचा वापर केला जातो. रस्त्यावरून प्रवास करताना वाहतुकीच्या नियमांचं (Traffic Rules) पालन करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा अनेक जणांकडून या नियमांकडे दुर्लक्ष केलं जातं. नियमांचं उल्लंघन केल्यावर वाहतूक पोलीस (Traffic Police) कारवाई करून दंड वसूल करतात. असा अनुभव अनेकांनी घेतला असेल. वाहतूक पोलिसांनी अडवल्यावर कारवाई टाळण्यासाठी वाहनचालत बऱ्याचदा विचित्र सबबी, कारणं सांगतात. या संदर्भात दिल्ली पोलिसांचं (Delhi Police) एक ट्वीट आणि त्यावर नेटिझन्सनी (Netizens) दिलेल्या प्रतिक्रिया सध्या खूप चर्चेत आहेत. कारवाई टाळण्यासाठी कोणती मजेशीर आणि अजब कारणं वाहनचालक देऊ शकतात, याचा अंदाज या प्रतिक्रियांवरून येतो. `नवभारत टाइम्स`नं याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

दिल्लीत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतर वाहनचालक दंड आणि कारवाईपासून वाचण्यासाठी बऱ्याचदा अजब कारणं (Strange Reasons) देतात. `कुत्र्यानं माझं लायसन्स खाल्लं आहे,` `गर्भवती असल्यानं मी सीट बेल्ट लावू शकत नाही,` `गर्लफ्रेंड माझी वाट पाहतेय,` अशा विचित्र कारणांचा यात समावेश असतो. याबाबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना वाहनचालकांनी त्यांची मतं मांडली आहेत. परंतु, 'माझ्याकडून पहिल्यांदाच नियमांचं उल्लंघन झालं आहे,' असं तुम्ही वाहतूक पोलिसांना सांगितलं तर तुम्हाला कदाचित दंड भरावा लागणार नाही, असं नेटिझन्सना वाटतं.

... तर तुमचा स्मार्टफोन तुम्हाला जेलमध्ये पोहचवू शकतो, फोन वापरताना काय काळजी घ्याल?

दिल्ली पोलिसांनी एक ट्वीट करून, वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यावर तुम्ही कारवाईपासून वाचण्यासाठी कोणती कारणं सांगता, असा प्रश्न नागरिकांना विचारला.

दिल्ली पोलिसांच्या या ट्वीटला नेटिझन्सनी विनोदी, काल्पनिक कारणं सांगून उत्तर दिलं. पोलिसांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सौरभ श्यामल नावाच्या व्यक्तीनं लिहिलं, `एक दिवस हेल्मेट न घातल्यानं पोलिसांनी मला पकडलं. त्यावर 'मी विद्यार्थी आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत,` असं कारण मी सांगितलं. एका महिलेनं कमेंटमध्ये लिहिलं, की `मी गर्भवती असल्यानं सीट बेल्ट लावू शकत नाही.`

FASTag खरेदी करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; नाहीतर फसवणूक झालीच म्हणून समजा

`वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यावर माझ्या मित्रानं दिलेलं कारण मी सांगत आहे. त्या वेळी तो म्हणाला होता, की माझ्या पत्नीचं एका व्यक्तीसोबत अफेअर सुरू आहे आणि ती सध्या त्याच्यासोबत आहे,` असं एका सोशल मीडिया युझरने (Social Media User) या ट्विटवर प्रतिक्रिया देताना लिहिलं.

पोलिसांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना दुसऱ्या एका व्यक्तीनं लिहिलं आहे, की, `सर, गर्लफ्रेंड माझी वाट पाहात आहे. मला जाऊ द्या, नाही तर माझा ब्रेकअप होईल. हे कारण दर वेळी फायदेशीर ठरतं.` एक युझर लिहितो, `सर, पहिल्यांदाच चूक झाली आहे. मला सोडून द्या. पुढच्या वेळी अशी चूक होणार नाही.`

वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यावर चालक अशी वेगवेगळी आणि अजब कारणं देतात. वाहतूक शाखेतल्या एका पोलीस अधिकाऱ्यास या कारणांबाबत विचारलं असता, त्यांनी सांगितलं, `वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना पकडलं जाणं ही सामान्य गोष्ट आहे. अशा वेळी दंड किंवा कारवाई टाळण्यासाठी बहुतांश जण कुटुंबाशी निगडीत कारणं सांगतात.` एकूणच नेटिझन्सनी दिलेल्या मजेशीर प्रतिक्रिया सध्या जोरदार चर्चेत आहेत.

First published:

Tags: Delhi Police, Traffic Rules