मराठी बातम्या /बातम्या /Viral /

दिल्ली पोलिसांनी 1861 साली दाखल केला होती पहिली FIR, काय होता गुन्हा?; Viral होतोय Photo

दिल्ली पोलिसांनी 1861 साली दाखल केला होती पहिली FIR, काय होता गुन्हा?; Viral होतोय Photo

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर शेअर झालेल्या या फोटोनं लोकांना आश्चर्यचकित केलं आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर शेअर झालेल्या या फोटोनं लोकांना आश्चर्यचकित केलं आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर शेअर झालेल्या या फोटोनं लोकांना आश्चर्यचकित केलं आहे.

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर: इंग्रजांच्या काळात कायदा आणि न्यायव्यवस्थेअंतर्गत ठिकठिकाणी पोलीस ठाणे स्थापन करण्यात आली होती. त्यातलं एक महत्त्वाचं ठाणं होतं ते दिल्लीतलं. दिल्ली पोलीस दल (Delhi Police Force) हे देशातलं एक अत्यंत जुनं पोलीस दल असून, ते अनेक ऐतिहासिक घटनांचं साक्षीदार आहे. अनेक ऐतिहासिक दस्तऐवज दिल्ली पोलीस दलाकडे आजही सुरक्षित आहेत. हे ऐतिहासिक दस्तऐवज त्या काळातलं देशातलं वातावरण, संस्कृती, गुन्हेगारी विश्व, लोकांची मानसिकता अशा अनेक महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकतात. एका मोठ्या कालखंडातल्या महत्त्वपूर्ण स्थित्यंतराचं दर्शनही त्यातून होतं. आजच्या आधुनिक काळातलं गुन्हेगारी विश्व आणि पोलीस दलाचं स्वरूप यात पूर्वीपेक्षा प्रचंड फरक झाला आहे. त्याचीच एक झलक सध्या सोशल मीडियावरील फोटोमुळे दिसत आहे.

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) 1861 साली म्हणजे तब्बल 160 वर्षांपूर्वी नोंदवलेल्या प्राथमिक चौकशी अहवालाचा अर्थात फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्टचा (FIR) हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ट्विटरवर शेअर झालेल्या या फोटोनं लोकांना आश्चर्यचकित केलं आहे. 'एनडीटीव्ही'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी NCB वर साधला निशाणा, म्हणाले...

थिंक टँक आणि स्ट्रॅटेजिक कन्सल्टन्सी असलेल्या 'डीपस्ट्रॅट' या संस्थेचे (Think tank and strategic consultancy DeepStrat)अध्यक्ष यशवर्धन आझाद (Yashovardhan Azad) यांनी सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे. यापूर्वी 2017 साली दिल्ली पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही या एफआयआरचा फोटो पोस्ट करण्यात आला होता.

त्या वेळी दिल्ली पोलिसांनी हा फोटो शेअर करताना, 'दिल्ली पोलिसांच्या इतिहासातील काही दुर्मीळ क्षणांसह. #tbt #KhaasHaiItihaas'अशी कॅप्शन दिली होती. तेव्हाही हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

या पहिल्या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलेला गुन्हा बघितला सर्वांनाच आश्चर्य वाटेल. काही भांडी आणि हुक्का चोरल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती. ही चोरी करणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हा एफआयआर उर्दू भाषेत लिहिलेला दिसत आहे. 18 ऑक्टोबर 1861 रोजी हा एफआयआर नोंदवण्यात आल्याचंही या फोटोत दिसून येते.

हेही वाचा- अनन्या पांडेचे 7 इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स फॉरेन्सिक लॅबमध्ये, सोमवारी होणार मोठा खुलासा 

यशोवर्धन आझाद यांनी आता पुन्हा एकदा हा फोटो शेअर करून इतिहासाला उजाळा दिला आहे. आझाद यांनी हा फोटो शेअर करताना, 'दिल्ली पोलिसांनी 1861मध्ये नोंदवलेल्या पहिल्या एफआयआरची ही नोंद . एक अनमोल दस्तऐवज आणि एक मौल्यवान माहिती,' अशी कॅप्शन लिहिली असून, त्यांनी या पोस्टमध्ये दिल्ली पोलीस आयुक्तांनाही (Delhi Police commissioner) टॅग केलं आहे.

ही पोस्ट शेअर झाल्यापासून त्यावर लोकांच्या वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. एका ट्विटर युझरने म्हटलं आहे, 'खरोखर अमूल्य.' एकाने 'वाह,' अशी कमेंट केली आहे. आणखी एका युझरनेही हा खूप मौल्यवान दस्तऐवज असल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा- लेहेंग्यात लपवून ऑस्ट्रेलियाला पाठवले जात होते 3 किलो ड्रग्ज, NCB नं केली कारवाई

सोशल मीडियावर शेअर झालेल्या या फोटोमुळे आजच्या काळातल्या अनेकांना ऐतिहासिक काळातल्या पोलीस दलाची झलक अनुभवता आली आहे.

First published:

Tags: Delhi Police