जाणून घ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारे दिल्ली पोलीस लाल टी-शर्टमध्ये का?

जाणून घ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणारे दिल्ली पोलीस लाल टी-शर्टमध्ये का?

आंदोलकांवर लाठीचार्ज करणारे पोलीस टीशर्टमध्ये कसे काय ? ते पोलिसांच्या गणवेशात का नाहीत? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर त्याविरोधात देशभर आंदोलने केली जात आहेत. यामध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलनाला हिंसक वळण लागले. इथं विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. यामध्ये पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तसेच जीन्स-टीशर्टमध्ये पोलीस कसे असा प्रश्नही निर्माण झाला.

सोशल मीडियावर आंदोलक विद्यार्थांना पोलिसांकडून मारहाणीचे व्हिडिओ-फोटो व्हायरल होत आहेत. यात अनेक दावे केले जात असताना पोलिसांनी त्यांचे जॅकेट आणि हेल्मेट बाहेरील तरुणांना घालण्यास देऊन विद्यार्थांना मारहाण केल्याचा आरोपही केला गेला. आता याबद्दल टाइम्स ऑफ इंडियाने फॅक्ट चेक केलं आहे.

पोलिसांचे जॅकेट घालून फिरत असलेला व्यक्ती संघटनेचा कार्यकर्ता असून पोलीस कर्मचारी नसल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला. तर आंदोलकांवर लाठिचार्ज करणारे पोलीस टीशर्टमध्ये कसे काय ? ते पोलिसांच्या गणवेशात का नाहीत? असेही प्रश्न विचारण्यात आले.

दरम्यान, टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, साध्या वेषात असलेली संबंधित व्यक्ती दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास पथकात कार्यरत आहे. याबद्दल दिल्ली पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.

साध्या वेषात अरविंद असे नाव असलेले हेल्मेट आणि लाल टी शर्ट घातलेले पोलिस कर्मचारी आहेत असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

विशेष तपास पथकाचं काम पाहता त्यांना पोलीस गणवेशाऐवजी साध्या कपड्यांमध्ये राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे साध्या वेषातील फोटो व्हायरल होत आहेत. मात्र ते पोलिस कर्मचारी असल्याचं दिल्ली पोलिसांती अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2019 01:03 PM IST

ताज्या बातम्या