Home /News /viral /

नो इन्फेक्शन! QR Code स्कॅन करा आणि रोबोच्या हस्ते भरपेट पाणीपुरी खा, पाहा VIDEO

नो इन्फेक्शन! QR Code स्कॅन करा आणि रोबोच्या हस्ते भरपेट पाणीपुरी खा, पाहा VIDEO

कुठल्याही व्यक्तीचा स्पर्श न होता आणि इन्फेक्शनचा धोका टाळून जर मनसोक्त पाणीपुरी खाता येणं शक्य आहे, असं सांगितलं, तर तुम्ही काय म्हणाल? पण हे शक्य आहे.

    नवी दिल्ली, 6 डिसेंबर: कुठल्याही इन्फेक्शनची भीती न बाळगता आता हवी तेवढी पाणीपुरी खाणं शक्य होणार आहे. कोरोनाच्या काळात इन्फेक्शन होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेकांनी पाणीपुरी खाणं बंद केलं होतं. पाणीपुरी हा हातानं तयार केला जाणारा आणि वाढणारा पदार्थ असल्यामुळे त्यातून कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची शक्यता गृहित घरून पाणीपुरीला मिळणारा प्रतिसाद कमी झाला होता. अनेक पाणीपुरी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद करत घरचा रस्ता धरला होता. मशीन देणार पाणीपुरी कोरोना काळात इन्फेक्शनची शक्यता टाळण्यासाठी दिल्लीतील एका अवलियानं आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत पाणीपुरी देणारं यंत्र तयार केलं आहे. या मशीनमध्ये पाणीपुरीसाठी आवश्यक असणारं सगळं साहित्य भरण्यात येतं. त्यानंतर पाणीपुरीला किंवा या मशीनलाही हात लावण्याची गरज भासत नाही. अशी मिळते पाणीपुरी ज्याला पाणीपुरी खायची इच्छा आहे, त्यानं मशीनसमोर उभं राहायचं. आपल्या मोबाईलमधून मशीनवर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करून 20 रुपयांचं पेमेंट करायचं. त्यानंतर खाली ठेवलेल्या काचेवरील बाऊलमध्ये पाणीपुरी ठेवण्यात येते. यासाठी ना कुठे स्पर्श करावा लागतो, ना कुठल्या व्यक्तीचा याच्याशी संपर्क येतो. हे वाचा- भारत-पाकिस्तान सीमेवर महिलेची प्रसूती; बाळाला दिलं खास नाव कोरोना फ्री पाणीपुरी कोरोना काळात अनेकांना पाणीपुरी खाण्याची इच्छा असली, तरी इन्फेक्शनच्या भीतीमुळे ती खाता येत नाही. मात्र ही पाणीपुरी खाताना माणसाचा संबंधच त्याच्याशी येणार नसल्यामुळे कुठलेही विषाणू त्यात येण्याचा प्रश्नच उद्भवणार नसल्याचं सांगितलं जात आहे. ज्यावेळी मशीनजवळ बसवलेल्या काचेजवळ तुम्ही ग्लास घेऊन जाल, तेव्हा मशीनमधून पाणीपुरीसाठी खास तयार केलंलं पाणी त्यात पडेल. तुम्ही ग्लास काढून घेतला की हे पाणी थांबेल. पण या पाण्याचा वापर करून तुम्ही स्वतः पाणीपुरीचा मनसोक्त आनंद घेऊ शकला. चार वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स यात असणार आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Delhi, Health, Video viral

    पुढील बातम्या