मराठी बातम्या /बातम्या /Viral /धडक दिल्याच्या रागातून वासराला दिल्या मरणयातना, दगडानं केलेल्या मारहाणीचा पाहा VIDEO

धडक दिल्याच्या रागातून वासराला दिल्या मरणयातना, दगडानं केलेल्या मारहाणीचा पाहा VIDEO

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत वासरू गंभीर जखमी देखील झालं आहे. त्याची एक छोटी धडक जीवघेणी ठरेल याची कल्पना देखील त्या वासराला नसावी.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत वासरू गंभीर जखमी देखील झालं आहे. त्याची एक छोटी धडक जीवघेणी ठरेल याची कल्पना देखील त्या वासराला नसावी.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत वासरू गंभीर जखमी देखील झालं आहे. त्याची एक छोटी धडक जीवघेणी ठरेल याची कल्पना देखील त्या वासराला नसावी.

    दिल्ली, 06 जानेवारी : एका सापाला वापरलेलं कंडोम घातल्याची नुकतीच घटना ताजी असताना आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माणूस इतका क्रूर आणि विकृत कसा असू शकतो हा व्हिडीओ पाहू नक्की प्रश्न पडू शकतो. लहान वासरानं धडक दिल्याच्या रागातून एका तरुणानं त्याला मरणयातना दिल्या आहेत.

    घडलं असं की रस्त्यानं जात असताना एका वासरानं या माणसाला धडक दिली. त्यामुळे माणसाच्या हातातील कागदपत्र रस्त्यावर कोसळली. याचा राग आणि संताप आला. म्हणून या विकृत व्यक्तीनं लाथा-बुक्क्यांनी वासराला मारहाण केलीच पण एवढं करून ही तो थांबला नाही तर शेजारचा दगड उचलून त्याला बेदम मारहाण करू लागला. जीवे मारण्याचा प्रयत्न करू लागला. या वासराच्या पाठीवर जोरजोरात दगडाने घाव करू लागला. गंभीर जखमी झालेलं हे पिल्लू अखेर वाचण्याची धडपड करून थकलं आणि खाली बसलं.तरीही विकृत व्यक्तीला जराही दया आली नाही तो मारत राहिला आणि दगड फेकून निघून गेला.

    ही धक्कादायक घटना दिल्ली परिसरात घडली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेत वासरू गंभीर जखमी देखील झालं आहे. त्याची एक छोटी धडक जीवघेणी ठरेल याची कल्पना देखील त्या वासराला नसावी. या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पूर्व दिल्लीतील मंडावली भागातील एक सीसीटीव्ही व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती वासराला वाईट पद्धतीनं मारहाण करत आहे. याची कोणीतरी पोलिसांना माहिती दिल्यानंतर या वासराला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

    First published: