मराठी बातम्या /बातम्या /Viral /Video : दिल्लीतील किडनॅपिंग केसच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य आलं समोर

Video : दिल्लीतील किडनॅपिंग केसच्या व्हायरल व्हिडीओचं सत्य आलं समोर

दिल्ली किडनॅपिंग केसचं सत्य काय?

दिल्ली किडनॅपिंग केसचं सत्य काय?

या 17 सेकंदाच्या या व्हिडिओने संपूर्ण दिल्लीत खळबळ उडवून दिली. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक तरुण एका तरुणीला जबरदस्ती मारहाण करत आहे आणि तिला जबरदस्ती गाडीत बसवून घेऊन जात आहे. हा व्हिडीओ समोर येताच या अज्ञात तरुणीला किडनॅप केलं आहे, असं सांगणात येत होतं. ज्यानंतर लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

या 17 सेकंदाच्या या व्हिडिओने संपूर्ण दिल्लीत खळबळ उडवून दिली. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे.

हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अनेकांनी या घटनेची पोलिसांनी दखल घ्यावी आणि अपराधींना अटक करावी अशी मागणी केली जात आहे. पण आता या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.

दुचाकी चालकाच्या मागच्या सीटवर होती अशी गोष्ट, पाहाताच रस्त्यावरील सर्वांनाच बसला धक्का

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मंगोलपुरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

तपासाअंती पोलिसांनी दावा केला आहे की, कारमधील भांडणानंतर मुलगी खाली उतरली आणि कुठेतरी जाऊ लागली. यानंतर दोन्ही मुले तिला परत कारमध्ये घेऊन जात होती. पोलिसांनी तिघांचाही शोध लावला असता, त्यांच्याना कळालं की व्हिडीओत दिसत असलेले लोक मित्र आहेत, त्यांच्यात जुन्या मुद्द्यावरून वाद झाले. यामुळे मुलगी रागाच्या भरात कॅबमधून खाली उतरली.

यानंतर मुलीला तिच्या मित्राने पुन्हा गाडीत बसवले. त्यावेळी रस्त्यावरून चालणाऱ्या एका व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. पोलिसांचे म्हणणे आहे की, तरुणीचा कलम 164 नुसार जबाब नोंदवला जाईल.

घटनाक्रम काय होता?

पोलीसांनी कॅबच्या नोंदणी क्रमांकावरून प्रथम कॅबच्या मालकाचा शोध घेण्यात आला. तो गुरुग्रामचा रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सांगितले की, कॅबचा पत्ता कळल्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने तेथे पाठवण्यात आले.

त्याचवेळी पोलिसांचे पथक संपूर्ण मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत पुढे गेले. पोलिसांना तीच कॅब गुरुग्रामच्या इफको चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली, त्यावरून ही कॅब शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तिथून गेल्याचे दिसून आले.

पोलिसांनी कॅबच्या मालकापर्यंत पोहोचून रात्री कॅब चालवणाऱ्या चालकाचा शोध घेतला. चालकाने पोलिसांना सांगितले की, तिघेही त्याच्या कॅबमध्ये चढले होते. तो रोहिणीहून विकासपुरीला जाण्यासाठी बसला होता. त्यांनी उबरच्या माध्यमातून कॅब बुक केली होती. कारच्या आत तिघांमध्ये कशावरून तरी वाद झाला आणि मुलगी रागाच्या भरात कॅबमधून खाली उतरली. यानंतर दोन्ही मुलांनी तिला पुन्हा कॅबमध्ये बसवले.

Video : कार धुत असलेल्या व्यक्तीसोबत भयंकर प्रकार, बिबट्याने एन्ट्री केली आणि...

उबेर बुकिंगच्या मदतीने पोलिसांनी आधी कॅब बुक केलेल्या मुलाचा शोध घेतला आणि त्यानंतर त्या मुलीचा आणि दुसऱ्या मुलाचाही शोध घेतला. तिघांचीही चौकशी केली असता तिघेही मित्र आणि रोहिणी सेक्टर 35 येथील रहिवासी असल्याचे समोर आले.

मुलगी खाजगी नोकरी करते. शनिवारी रात्री उशिरा तिघेही एकत्र जात होते. जुन्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि मुलगी कॅबमधून खाली उतरली. त्यांचा जबाब घेतल्यानंतर हा अपहरणाचा प्रकार नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पण हा प्रकार नक्की काय आहे? नक्की काय घडलं होतं, याबाबत मुलीचा जबाब घेतला जाईल.

First published:
top videos

    Tags: Delhi, Shocking, Social media, Top trending, Viral