मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Love You Zindagi:ICU बेड न मिळूनही कोरोनाशी लढा देतेय ही तरुणी, डॉक्टरांनीच शेअर केला VIDEO

Love You Zindagi:ICU बेड न मिळूनही कोरोनाशी लढा देतेय ही तरुणी, डॉक्टरांनीच शेअर केला VIDEO

एका रुग्णालयात भरती असलेल्या 30 वर्षीय तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही तरुणी स्वत: कोरोनाबाधित असून, ती स्वत: याविरोधात लढत असून इतरांनाही या रोगापासून लढण्याची प्रेरणा देत आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 13 मे : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरूच आहे. देशात कित्येक दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळत आहेत. या व्हायरसमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. रुग्णांच्या दररोजच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात रुग्णांना बेड आणि ऑक्सिजनची मोठी कमतरता भासत आहे. अशा कठीण काळातही डॉक्टर्स, नर्सेस दिवस-रात्र मेहनत करुन कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी, त्यांना बरं करण्यासाठी मेहनत करत आहेत. याच काळात सोशल मीडियावर असेही अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे, ज्यामुळे इतर रुग्णांना या व्हायरसशी दोन हात करण्याची हिम्मत मिळतेय.

दिल्लीच्या एका रुग्णालयात भरती असलेल्या 30 वर्षीय तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही तरुणी स्वत: कोरोनाबाधित असून, ती स्वत: याविरोधात लढत असून इतरांनाही या रोगापासून लढण्याची प्रेरणा देत आहे. या तरुणीचा व्हिडीओ रुग्णालयातील एका डॉक्टरांनीच शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत, एकीकडे या तरुणीच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावल्याचं दिसतंय आणि दुसरीकडे 'लव्ह यू जिंदगी' गाणंही सुरू आहे, कधीही हिम्मत सोडू नका, असं त्या डॉक्टरांनी लिहिलंय.

(वाचा - कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर 12 ते 16 आठवडे असावं, NTAGI चा सल्ला)

व्हिडीओ शेअर करत डॉ. मोनिका लंगेह यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'या 30 वर्षीय तरुणीला आयसीयू बेड मिळाला नाही. तरीही गंभीर परिस्थितीत या तरुणीवर कोविड इमरजेन्सीमध्ये उपचार सुरू केले गेले आणि गेल्या 10 दिवसांपासून उपचार सुरू आहेत. सध्या ही मुलगी एनआयव्ही सपोर्टवर आहे. तिला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आलं आहे आणि प्लाज्झा थेरेपीही करण्यात आली आहे. या मुलीची इच्छाशक्ती अतिशय मजबूत आहे. आज तिने मला हे गाणं लावण्यास सांगितलं आणि मीदेखील तिला गाणं लावून दिलं. कधीही हिम्मत सोडू नका' अशी शिकवणचं या मुलीने दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

(वाचा - VIDEO:आपल्या साथीदारांना वाचवण्यासाठी सिंहाशी भिडली म्हैस; पुढे असं काही झालं...)

डॉक्टर मोनिका लंगेह यांनी हा व्हिडीओ 8 मे रोजी ट्विटरवर शेअर केला होता. हा व्हिडीओ अनेकांनी लाईक, रिट्विट केला असून सोशल मीडियावरही तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हिम्मत न हारता, कोरोनाशी लढणाऱ्या या तरुणीचं अनेकांकडून कौतुंक केलं जात आहे.

First published:

Tags: Corona patient, Coronavirus, Video viral