नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : सध्या दिल्लीत निवडणुकांमुळे वातावरण तापले आहे. विधानसभेच्या प्रचाराचा धडाका सर्वच पक्षांनी लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजच्या प्रचारसभेत शाहीन बाग प्रकरणावरून जोरदार निशाणा साधला. दरम्यान, सोशल मीडियावरही दिल्ली विधानसभेचे वारे वाहताना दिसत आहेत. प्रत्येक पक्षाचे समर्थक व्हिडिओ, फोटो आणि पोस्टमधून पक्षांचे समर्थन करताना दिसत आहेत. यातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भाजपला पाठिंबा देत असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. भाजपला पाठिंबा देत असला तरी मत मात्र आम आदमी पार्टीला देणार असं त्यानं म्हटलं आहे. यात त्याने भाजपचा झेंडा आणि टोपीही घातली आहे. टिकटॉकवर या व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे.
व्हिडिओमध्ये एक तरुण भाजपची टोपी आणि मोदींचा फोटो लावून रॅलीत सहभागी झालेला दिसतो. तो म्हणतो की, मी आम आदमी पक्षाचा आहे. इथं मी आलोय 300 रुपयांत... मी मत तर आम आदमी पार्टीलाच देणार, काळजी करू नका.
सोशल मीडियावर व्हायर होत असलेला हा व्हिडिओ गुड्डू अन्सारी नावाच्या टिकटॉक युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 7 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. तसेच याला 80 लाइक्स मिळाले आहेत.
फक्त 12 जणांसाठी शेअर केला 5 सेकंदाचा VIDEO, एका रात्रीत ती झाली World Famous
दिल्लीमध्ये शनिवारी 8 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. विधानसभेचा निकाल 11 फेब्रुवारीला लागणार आहे. दिल्लीत विधानसभेच्या 70 जागा आहेत. सध्या दिल्लीत आपचे सरकार आहे.
आजी-आजोबांच्या भन्नाट डान्सचे युझर्सही झाले दिवाने, VIDEO VIRAL मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.